Silent killer cholesterol: सावध व्हा...! कोणतीही लक्षणं न दिसताही शरीरात वाढू शकतं कोलेस्ट्रॉल; कसे उपाय कराल, तज्ज्ञांची माहिती

Cholesterol increase symptoms: आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदललेल्या आहार-विहारामुळे अनेक लोकांना कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे, शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तरी त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत
High cholesterol no symptoms dangerous
High cholesterol no symptoms dangeroussaam tv
Published On

३८ वर्षांचे राजीव मेहता त्यांच्या फिजिशियनच्या क्लिनिकमध्ये नियमित तपासणीसाठी गेले होते. तेव्हा तपासणीतून असं समोर आलं ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. मुळात त्यांना कोणतीही लक्षणं जाणवलेली नव्हती. मात्र तरीही तपासणीत उच्च एलडीएल कोलेस्टेरॉल असल्याचे दिसून आलं. यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

कोलेस्ट्रॉलची समस्या सहसा वयोवृद्ध व्यक्तींमध्ये असते किंवा ही समस्या केवळ जीवनशैलीच्या घटकांशी निगडित असते अशा गैरसमजांमुळे अनेक रुग्णांना आश्चर्याचा असाच धक्का बसतो. तरुणांमध्ये याचं प्रमाण वाढलं आहे यावरून जागरूकता कमी असल्याचं दिसून येतं. अशातच नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून, भारतात उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या ३१ टक्के एवढी लक्षणीय वाढली असल्याचं दिसून आलंय.

लक्षणं का आढळून येत नाही?

उच्च एलडीएलसीची कोणतीही लक्षणं जाणवत नाही. ते धमन्यांमध्ये जमा होऊ लागतं आणि रक्ताभिसरणात अडथळे निर्माण करतं. यामुळे रूग्णाला गंभीर स्वरूपाच्या हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. यामध्ये नंतरच्या टप्प्यात तीव्र उपचार देऊनही हे विकार पूर्णपणे बरे न होण्याचा धोका असतो.

एलडीएलसी अधिक वाढल्यामुळे प्लाक तयार होण्याची प्रक्रिया जलद होते. विशेषत: अतिधोका असलेल्या व्यक्तींमध्ये, म्हणजेच मधुमेह, हायपरटेन्शन हे आजार असलेल्यांमध्ये किंवा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हे अधिक प्रकर्षाने आढळते.

राजीव मेहता यांनी सांगितलं की, मला कधीच आजारी असल्यासारखे वाटलं नाही. त्यामुळे ही गोष्ट स्वीकारणं माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. मला वाटायचे, कोलेस्ट्रॉलची समस्या वयोवृद्ध लोकांना होते किंवा जे लोक रोगी दिसतात त्यांना जाणवते. माझ्या शरीरात हृदयविकार मूकपणे वाढत आहे, याची कल्पनाच नव्हती.”

High cholesterol no symptoms dangerous
Eye cancer symptoms: डोळ्यांमध्ये 'हे' बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय; पाहा डोळ्यांमध्ये गाठी झाल्यास कोणती लक्षणं दिसतात?

मुंबईच्या सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या कार्डिअॅक सायन्सेस विभागाचे संचालक आणि विभागप्रमुख डॉ. अजित मेनन म्हणाले, “केवळ वयाची ५० वर्षे उलटल्यानंतरच कोलेस्टेरॉलची चिंता करण्याची गरज आहे हा समज कालबाह्य आहे. प्रत्यक्षात धमन्या मोठ्या प्रमाणात संकुचित होऊ लागलेले ४० वर्षांच्या आतील अनेक रुग्ण आमच्याकडे येतात. त्यांना कोणतंही लक्षण जाणवत नसतं पण त्यांचं आरोग्य धोक्यात असतं.

भारतातील कोलेस्ट्रॉल समस्येच्या वाढीमागे निदानच न होणं हे प्रमुख कारण आहे. कोणतीही लक्षणं जाणवत नसतानाही लिपिड प्रोफाइल्सच्या माध्यमातून नियमित तपासणी करत राहणं अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या सुरक्षित आणि परिणामकारक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. औषधे एकदा घेण्यास सुरुवात केल्यानंतर सातत्याने घेतली पाहिजेत. औषधं बंद करणं किंवा स्वत:हून डोस बदलणं यांमुळे उपचारांत झालेली प्रगती निरुपयोगी ठरते, असंही डॉ. मेनन म्हणालेत.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कोलेस्ट्रॉल प्रकारांमध्ये ‘वाईट कोलेस्टेरॉल’ किंवा एलडीएल अधिक घातक असतं. एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करणं हे आपल्या नियंत्रणात असतं आणि आधीपासून अस्तित्वात असलेला कोरोनरी धमन्यांचा आजार बरा करण्यासाठी किंवा तो टाळण्यासाठी आपण ते नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.

पारंपरिक पर्याय आवश्यक तो परिणाम साध्य करून देऊ शकत नसतील तर अधिक प्रगत उपचारपद्धती उपलब्ध आहेत. नियमित उपचारपद्धतींना प्रतिसाद मिळाला नाही, तर पीसीएसकेनाइन, सिर्ना उपचारपद्धती किंवा इनक्लिसायरन यांसारखे लक्ष्याधारित उपचार रुग्णांना अपेक्षित एलडीएलसी पातळी गाठून देण्यात मदत करण्यासाठी आशेचा किरण ठरत आहेत.

High cholesterol no symptoms dangerous
Brain fluid: मेंदूमध्ये पाणी झाल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच उपचार करा अन्यथा परिस्थिती ठरेल जीवघेणी

शिवाय ‘चांगले कोलेस्टेरॉल’ म्हणून ओळखले जाणारे एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो, कारण हे कोलेस्ट्रॉल रक्तप्रवाहातील अतिरिक्त एलडीएलसी बाहेर टाकते. यासाठी जीवनशैलीत अनेक बदल करणं आवश्यक असतं.

राजीव मेहता सांगतात, “मला प्रथम सगळे नैसर्गिकरित्या होऊ देण्याचा प्रयत्न करायचा होता. मला वाटले, मी योग्य आहार घेतला, अधिक व्यायाम केला तर कदाचित गोळ्या घेणे टाळू शकेन.” त्यांच्या प्रयत्नांमुळे एकंदर तंदुरुस्ती सुधारली तरी एलडीएलसीवर फारसा परिणाम झाला नाही.

High cholesterol no symptoms dangerous
Monsoon gangrene risk: पावसाळ्यात वाढतो पायांच्या गँगरीनचा धोका; काय घ्याल काळजी, तज्ज्ञांनी दिली माहिती

एलडीएलसीला अपेक्षित श्रेणीत आणायचं असेल तर जीवनशैलीतील बदलांना उपचारांची जोड मिळणंही गरजेचं आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेतल्यास उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल परिणामकारकरित्या व्यवस्थापित होऊ शकतं. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती आहे यानुसार दर ३-६ महिन्यांनी नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. उपचारांनी उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होत नाही. तर कोलेस्टेरॉल नियंत्रित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com