Eye cancer symptoms: डोळ्यांमध्ये 'हे' बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय; पाहा डोळ्यांमध्ये गाठी झाल्यास कोणती लक्षणं दिसतात?

Signs of eye tumor: डोळ्यांमध्ये कर्करोग शरीराच्या इतर भागातून पसरू शकतो किंवा डोळ्यातच उत्पन्न होऊ शकतो. डोळ्याच्या कोणत्या भागात गाठ आहे, यावर लक्षणे अवलंबून असतात.
Eye cancer symptoms
Eye cancer symptomssaam tv
Published On
Summary
  • डोळ्यांना देखील कॅन्सर होऊ शकतो, जो घातक असून इतर अवयवांपर्यंत पसरू शकतो.

  • डोळ्याच्या कॅन्सरची लक्षणे सामान्य डोळ्याच्या त्रासासारखी असतात, त्यामुळे ओळखणे कठीण होते.

  • अचानक दृष्टीत बदल, फ्लोटर्स, डोळ्यात चमक येणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

डोळ्यांच्या आरोग्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. मात्र डोळ्यांचाही कॅन्सर होऊ शकतो हे तुम्हाला माहितीये का? डोळ्यांच्या किंवा डोळ्याभोवतीच्या पेशी अनियंत्रितपणे वाढायला लागल्या की त्यांचं रूपांतर ट्युमरमध्ये होतं. हा ट्युमर सौम्य (non-cancerous) किंवा घातक (cancerous) असू शकतो.

जर ट्यूमर घातक असेल तर तो इतर अवयवांपर्यंतही पसरण्याचा धोका असतो. म्हणून डोळ्याच्या कॅन्सरचं लवकर निदान आणि तात्काळ उपचार अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य वेळी उपचार झाले तर दृष्टी वाचवता येते आणि आरोग्य टिकवून ठेवता येतं.

डोळ्याच्या कॅन्सरची लक्षणं ओळखा

डोळ्याच्या कॅन्सरची लक्षणं वेगवेगळी असू शकतात. काही वेळा ती सामान्य डोळ्याच्या त्रासासारखी वाटू शकतात त्यामुळे वेळेवर लक्ष जाणं कठीण होतं. खालील लक्षणं जाणवली, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Eye cancer symptoms
Kidney cancer: किडनी कॅन्सर झाल्यावर शरीरात 'हे' 7 बदल दिसून येतात; 99% लोकं सामान्य समजून दुर्लक्ष करतात

दृष्टीतील बदल

अचानक दृष्टिदोष, अस्पष्ट दिसणं, बाजूची दृष्टी कमी होणं किंवा अचानक अंधुकपणा होणं ही लक्षण डोळ्यातल्या ट्युमरमुळे डोळ्याच्या महत्वाच्या भागांवर दबाव आल्याने होऊ शकतात.

डोळ्यात चमक दिसणं

काही लोकांच्या डोळ्यांत छोटे काळे ठिपके किंवा रेघोट्या दिसतात. जे 'फ्लोटर्स' म्हणून ओळखले जातात किंवा अचानक प्रकाशाची चमक जाणवते. हे लक्षण डोळ्यांच्या आतील बदलांचं संकेत असू शकतं.

डोळ्यांमध्ये दिसणारे बदल

डोळ्याच्या पांढऱ्या भागावर किंवा डोळ्याच्या बाह्यभागावर गडद ठिपका वाढत असणं हे देखील डोळ्यांच्या कॅन्सरचं लक्षण असतं. बुबुळाच्या आकारात किंवा रंगात बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Eye cancer symptoms
Heart attack risk: फक्त 108 रुपये अन् 2 मिनिटांत हार्ट अटॅकचा धोका कळणार; पाहा नेमकं कसं?

डोळ्यांत टोचल्यासारखं होणं

डोळ्यांत सतत टोचल्यासारखं होणं, जळजळ किंवा लालसरपणा जाणवणं आणि ते कोणत्याही सामान्य उपायांनी कमी न होणं हे कधी कधी गंभीर स्थितीचं लक्षण असू शकतं.

डोळ्याच्या पापणीवर गाठ

डोळ्याच्या पापणीवर किंवा डोळ्याच्या आतील भागात गाठ जाणवणं आणि ती हळूहळू वाढणं हे देखील डोळ्यांच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

Eye cancer symptoms
Heart disease risk: छातीत दुखेपर्यंत वाट पाहू नका...! ताण-जीवनशैलीचा तरूणांच्या हृदयावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी सांगितली कारणं

डोळ्याचा कॅन्सर अनेकदा डॉक्टरांकडून नियमित तपासणी दरम्यान उघड होतो. त्यामुळे डोळ्यांची वारंवार तपासणी होणं अत्यंत आवश्यक आहे. खास करून वय वाढल्यावर काही आरोग्यविषयक समस्या असतील, तर डोळ्यांचे चेकअप नियमितपणे करणं गरजेचं आहे.

Q

डोळ्याचा कॅन्सर कसा होतो?

A

डोळ्यातील पेशी अनियंत्रितपणे वाढल्याने ट्यूमर तयार होऊन तो कॅन्सरमध्ये बदलू शकतो.

Q

डोळ्याच्या कॅन्सरची मुख्य लक्षणे कोणती?

A

दृष्टीत बदल, फ्लोटर्स, डोळ्यात चमक, लालसरपणा, गाठ येणे.

Q

फ्लोटर्स म्हणजे काय?

A

डोळ्यात दिसणारे काळे ठिपके किंवा रेषा, जे कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

Q

डोळ्याचा कॅन्सर कधी ओळखला जातो?

A

बहुतेकदा नियमित डोळ्यांच्या तपासणीदरम्यान तो लवकर ओळखला जातो.

Q

डोळ्याची तपासणी किती वेळा करावी?

A

वयानुसार आणि आरोग्यानुसार नियमितपणे, विशेषतः 40 वर्षांनंतर वारंवार तपासणी करावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com