Heart attack risk: फक्त 108 रुपये अन् 2 मिनिटांत हार्ट अटॅकचा धोका कळणार; पाहा नेमकं कसं?

How to identify heart attack risk: आजच्या धकाधकीच्या जीवनात हृदयविकाराचा धोका वाढला आहे आणि प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या आरोग्याबद्दल चिंतित असतो. अशात फक्त १०८ रुपयात आणि २ मिनिटांत हृदयविकाराचा धोका ओळखता येणार आहे.
Heart attack risk
Heart attack risksaam tv
Published On
Summary
  • आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वैद्यकीय क्षेत्रात वापरलं जातंय, विशेषतः हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी.

  • एआयच्या मदतीने हृदयविकाराचा धोका फक्त 2 मिनिटांत ओळखता येऊ शकतो.

  • मुंबईतील खाजगी रुग्णालयात भारतातील पहिले एआय-सक्षम हृदयविकार प्रतिबंधक मॉडेल लाँच करण्यात आलंय

Summary

सध्याचं युग हे AI चं आहे. आतापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये AI ने उत्तम कामगिरी केली आहे. वैद्यकीय विज्ञान देखील याला अपवाद ठरलेलं नाही. वैद्यकीय क्षेत्रात देखील AI ने आता त्याची जादू दाखवली आहे. लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या मदतीने एक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

आता AI ज्याच्या मदतीने हृदयविकाराचा धोका फक्त दोन मिनिटांत ओळखता येणार आहे. डॉक्टर ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका किती आहे हे आधीच सांगू शकणार आहे. शनिवारी, मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात महाराष्ट्रातील पहिलं एआय-सक्षम हृदयविकार प्रतिबंधक मॉडेल लाँच करण्यात आलं.

लवकरच सरकारी रुग्णालयांमध्येही सुरू होणार

एआयचे संस्थापक नमन गोसालिया यांनी सांगितलं की, लवकरच सरकारी रुग्णालयांमध्ये हे सुरू केले जाणार आहे. हा अभ्यास २०३५ लोकांवर करण्यात आला. त्यापैकी ६२ टक्के लोक हृदयरोगाच्या उच्च जोखीम श्रेणीत, ३ ते ५ टक्के लोक कमी जोखीम श्रेणीत आणि उर्वरित लोक मध्यम जोखीम श्रेणीत आढळले. तर या लोकांमध्ये आजाराची लक्षणं नव्हती.

हृदयाच्या आजारांचा धोका ओळखणं आता सोपं

ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित देसाई म्हणाले की, हृदयरोग लाखो भारतीयांना प्रभावित करतो आणि बहुतेकदा त्याचे निदान उशिरा होते. म्हणूनच वेळेवर प्रतिबंध करण्यासाठी पुढाकार घेत, जसलोक रुग्णालय अँड रिसर्च सेंटरने भारतातील पहिले एआय-आधारित डॉक्टर असिस्टंट अँजाइना एक्स एआय लाँच केलं आहे. यातून रुग्णाचा धोका ओळखणं सोपं होणार आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार

हृदयरोगाचा धोका काही मिनिटांतच मोजता येतो, तोही लक्षणे दिसण्यापूर्वी. लोक फक्त १०८ रुपयांच्या शुल्कात ही एआय चाचणी करू शकणार आहे. पद्मभूषण आणि रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अश्विन बी. मेहता यांनी सांगितलं की, प्रगत एआयच्या मदतीने आपण नुकसान सुरू होण्यापूर्वीच जोखीम मूल्यांकन करू शकतो.

Q

हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जात आहे?

A

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर करून हृदयविकाराचा धोका ओळखला जातो.

Q

AI चाचणी किती वेळात धोका ओळखू शकते?

A

एआय फक्त 2 मिनिटांत हृदयविकाराचा धोका ओळखू शकते.

Q

ही चाचणी कोठे सुरू करण्यात आली आहे?

A

ही चाचणी मुंबईतील जसलोक रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे.

Q

सरकारी रुग्णालयांमध्ये ही चाचणी उपलब्ध होणार आहे का?

A

होय, ही चाचणी लवकरच सरकारी रुग्णालयांमध्येही उपलब्ध होणार आहे

Q

ही AI चाचणी किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे?

A

ही चाचणी फक्त 108 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com