
पायांच्या संसर्गावर वेळीच लक्ष न केल्यास गँगरीनची समस्या होऊ शकते. या तक्रारीवर वेळीच लक्ष दिल्यास पाय कापून टाकण्यासारखी गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकतं. यासाठीच आज प्रतिबंधात्मक उपाय आणि टिप्स सांगण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढण्यासाठी अनकुल असं वातावरण तयार होतं, विशेषतः मधुमेह, रक्ताभिसरण, पायाला जखमा असलेल्या व्यक्तींमध्ये या दिवसात संसर्गाचा धोका वाढतो. पावसाळ्यात विकसित होऊ शकणारी एक गंभीर स्थिती म्हणजे पायांचं गँगरीन. हे एक वेदनादायक आणि जीवघेणं इन्फेक्शन आहे, जे ऊतींना नुकसान पोहोचवतं. वेळीच उपचार न केल्यास संसर्ग झालेला अवयव कापावा लागू शकतो.
चेंबूरमधील सुराणा सेठिया हॉस्पिटलचे व्हॅस्क्युलर सर्जन आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अशांक बन्सल म्हणाले की, पायातील गँगरीन म्हणजे रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे किंवा गंभीर जिवाणू संसर्गामुळे शरीरातील निरोगी ऊती मृत पावतात. बहुतेकदा ते बोटं आणि पायांवर परिणाम करतात. पावसाळ्यात ओलसर, घाणेरड्या परिस्थितीमुळे त्वचेचे नुकसान आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो.
रक्ताभिसरण प्रक्रियेत बिघाड
जखमा किंवा अल्सर
बुरशीजन्य किंवा जिवाणू संसर्ग
ओली पादत्राणे किंवा मोजे वापरणे
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
पाय किंवा बोटांमध्ये सुन्नपणा किंवा तीव्र वेदना, त्वचा काळी, निळी किंवा हिरवी पडणे, दुर्गंधीयुक्त स्त्राव किंवा पू, ताप आणि सूज तसेच प्रभावित भागात त्वचा थंडगार पडणे किंवा फिकट होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
गँगरीन जलद गतीने पसरू शकतो ज्यामुळे रक्त विषबाधा (सेप्सिस), ऊतींचे नुकसान आणि ऊती मृत पावण्याचा धोका असतो. गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी संसर्ग झालेला अवयव कापण्याची आवश्यकता भासू शकते.
पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
ओले मोजे आणि शूज ताबडतोब बदला.
दररोज पायांची पाहणी करा, फोड, जखम किंवा रंग बदलेला दिसला तर त्वरीत तपासणी करा.
अनवाणी पायांनी चालणं टाळा, अगदी घरातील फरशीवरही अनवाणी चालू नका.
कोणत्याही जखमांवर त्वरित उपचार करा आणि संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांसाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.