Severe period cramps: काही महिलांना मासिक पाळीत तीव्र वेदना का होतात? रिसर्चमधून उलगडलं कारण

Why do some women have severe menstrual pain: सिक पाळी (Menstrual Cycle) हा महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक भाग आहे. अनेक महिलांना या काळात हलकी पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवते, पण काही महिलांना असह्य आणि तीव्र वेदना होतात.
Why do some women have severe menstrual pain
Why do some women have severe menstrual painsaam tv
Published On
Summary
  • मासिक पाळीच्या वेदना फक्त प्रॉस्टाग्लॅंडिन्समुळे होत नाहीत.

  • 12-HETE आणि PAF नवीन वेदनाकारक घटक सापडले आहेत.

  • प्रत्येक महिलेची शारीरिक प्रतिक्रिया वेगळी असते.

मासिक पाळीतील वेदनांना वैद्यकीय भाषेत डिस्मेनोरिया (Dysmenorrhea) असं म्हणतात. हा त्रास जगभरातील लाखो महिलांसाठी दर महिन्याला एक मोठं आव्हान ठरतं. काहींना हलक्या वेदना जाणवतात, तर काहींसाठी हा त्रास इतका तीव्र असतो की शाळा किंवा ऑफिसला जाणं किंवा कामकाज करणं अशक्य होतं. एवढंच नाही तर या वेदनांचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की, या वेदनांचे मुख्य कारण प्रॉस्टाग्लॅंडिन्स नावाचं रसायन आहे. परंतु ताज्या संशोधनात समोर आलं आहे की, खरी गोष्ट याहून अधिक गुंतागुंतीची आहे. नवा बायोमार्कर्स, हार्मोनल बदल आणि प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील वैयक्तिक भिन्नता यांचाही मोठा सहभाग आहे.

पाळीदरम्यान कळा का होतात?

दर महिन्याला गर्भाशयाची आतील परत (एंडोमेट्रियम) बाहेर पडतं. या प्रक्रियेत प्रॉस्टाग्लॅंडिन्स स्रवलं जातं. हे रसायन गर्भाशयातील स्नायूंना आकुंचन पावण्यास भाग पाडतं. त्यातून रक्तवाहिन्यांवर ताण येतो, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळेच वेदना आणि क्रॅम्प्स निर्माण होतात.

नव्या शोधाने उलगडला दुसरा पैलू

2025 मध्ये Molecular Pain या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात असं स्पष्ट झालं की, मासिक पाळीच्या काळात बाहेर पडणाऱ्या द्रवामध्ये (menstrual effluent) 12-HETE आणि Platelet Activating Factor (PAF) नावाचे अणू आढळतात. हे अणू वेदना आणि सूज वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः ज्या महिलांवर सामान्य वेदनाशामक औषधं (NSAIDs) परिणाम करत नाहीत, त्यांच्यात हे अणू अधिक एक्टिव्ह असतात.

Why do some women have severe menstrual pain
High blood pressure: ही ५ लक्षणं दिसली तर समजा ब्लड प्रेशर वाढलंय; हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी लक्षणं ओळखा

हार्मोनल आणि अनुवांशिक फरकाचा प्रभाव

ज्या मुलींच्या शरीरात हार्मोनल चढ-उतार जास्त असतात. त्यांना पाळीतील वेदना अधिक तीव्र होतात. घरातील आई किंवा बहिणींना हा त्रास जास्त असल्यास पुढच्या पिढीतही त्याची शक्यता वाढते. याशिवाय एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉइड किंवा अॅडेनोमायोसिससारखे आजारही यामागे कारणीभूत असतात.

काही महिलांना त्रास जास्त का होतो?

नवीन संशोधनानुसार असं समोर आलं आहे की, प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया (biochemical reaction) देतं. काहींमध्ये प्रॉस्टाग्लॅंडिन्स जास्त प्रमाणात तयार होतात, तर काहींमध्ये 12-HETE आणि PAF अणूंचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळेच एकाच औषधाने काहींना आराम मिळतो, तर काहींना मुळीच फायदा होत नाही.

Why do some women have severe menstrual pain
What is Frank's sign: शरीरातील 'या' महत्त्वाच्या भागावर खूण असेल तर हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं शास्त्रीय कारण

आग्र्यातील सरोजिनी नायडू वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निधी यांनी सांगितलं की, “सर्व महिलांचा त्रास सारखाच असतो असं नाही. काहींना साधं पेनकिलर औषध पुरेसं असतं. पण ज्या महिलांवर त्याचा परिणाम होत नाही, त्यांच्या शरीरात इतर सूज निर्माण करणारे अणू अधिक एक्टिव्ह असतात. त्यामुळे भविष्यात प्रत्येक महिलेच्या शरीर रचनेनुसार स्वतंत्र उपचार (Personalised treatment) करता येतील.”

दर महिन्याला औषध घेणं योग्य आहे का?

NSAIDs (जसं की मेफेनॅमिक अॅसिड, आयबुप्रोफेन) हे प्रॉस्टाग्लॅंडिन्स कमी करतात आणि बहुतांश महिलांमध्ये उपयुक्त ठरतात. पण यांचा दीर्घकाळ वापर केल्यास एसिडीटी, पोटातील अल्सर किंवा किडनीवर परिणाम होऊ शकतो. यावेळी काहीजणी हार्मोनल पिल्स घेतात. या अंडोत्सर्जन (Ovulation) थांबवून प्रॉस्टाग्लॅंडिन्सचे प्रमाण कमी करतात. योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली घेतल्यास या दीर्घकाळ सुरक्षित मानल्या जातात.

Why do some women have severe menstrual pain
Young Age Heart Attack Signs: कमी वयात हॉर्ट अटॅक येण्याची लक्षणे काय?

काय करावे?

  • पाळीदरम्यान हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग करा यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.

  • Hot compress हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे.

  • आहारात विटामिन D, B12 आणि लोहयुक्त पदार्थ घ्या.

  • जर वेदना इतक्या तीव्र असतील की दैनंदिन कामात अडथळा येतो, तर त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Why do some women have severe menstrual pain
Hair Loss: अचानक केस गळती सुरु झालीये? सावध व्हा, हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं; पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं

काय करू नये?

  • कधीही रिकाम्या पोटी औषध घेऊ नका. त्यामुळे आम्लपित्त आणि अल्सरचा धोका वाढतो.

  • स्वतःहून वारंवार औषधं घेऊ नका.

  • प्रत्येक वेदना साधी आहे असे समजू नका, कारण हा त्रास एंडोमेट्रियोसिससारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकतो.

  • अति कॅफेन, जंक फूड आणि झोपेचा अभाव या गोष्टी वेदना वाढवतात.

Why do some women have severe menstrual pain
Health facts: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघेदुखीचा त्रास होतो? वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य काय, वाचा!
Q

मासिक पाळीच्या वेदनांना वैद्यकीय भाषेत काय म्हणतात?

A

डिस्मेनोरिया (Dysmenorrhea) म्हणतात.

Q

पाळीतील वेदनांमागील नवीन शोध कोणते आहेत?

A

12-HETE आणि Platelet Activating Factor (PAF) हे नवीन घटक आहेत.

Q

काही महिलांना औषधांचा परिणाम का होत नाही?

A

त्यांच्या शरीरात इतर वेदनाकारक अणू अधिक सक्रिय असतात.

Q

पाळीतील वेदनांवर गरम पट्टीचा काय फायदा आहे?

A

हॉट कंप्रेस रक्तप्रवाह सुधारून वेदना कमी करते.

Q

वेदना तीव्र असल्यास कोणाचा सल्ला घ्यावा?

A

त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com