Accused professors arrested in Bengaluru for repeated assault and blackmail of college student. Saam TV News Marathi
देश विदेश

बायोलॉजी-फिजिक्सच्या प्राध्यापकांनी विद्यार्थिनीचा केला बलात्कार, ब्लॅकमेल करत लुटली अब्रू

Bengaluru rape case : बंगळुरूमध्ये दोन प्राध्यापकांनी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्लॅकमेल करून तिच्यावर अनेकदा अत्याचार झाला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Karnataka student files FIR against professors for sexual assault and harassment : गुरुला 'आद्य' मानले जाते, कारण भारतीय संस्कृतीत गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरू-शिष्याच्या नात्याला भारतामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. पण गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बंगळुरूमध्ये घडल्याचे समोर आले आहे. बायोलॉजी आणि फिजिक्स शिकवणार्‍या प्रोफेसरने विद्यार्थीनीच्या अब्रूचे लचके तोडल्याची संतापजनक घडना घडली आहे. कोलकातामधील लॉ आणि मेडिकल कॉलेजमधील बलात्काराच्या घटनेमुळे देशात संतापाची लाट असतानाच बंगळुरूमधील ही लाजिरवाणी घटना समोर आली आहे.

कर्नाटकमधील बेंगळुरू येथे दोन प्रोफेसरच्या लज्जास्पद कृत्याने संतापाची लाट उसळली आहे. बायोलॉजी आणि फिजिक्स विषयांच्या शिक्षकांनी ब्लॅकमेल करत एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला. नराधमांनी मुलीला ब्लॅकमेल करून अनेक वेळा आपल्या वासनेचे बळी बनवले. कॉलेजमधील विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपाखाली या दोन शिक्षकांसह त्यांच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक मिडियाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र आणि संदीप अशी दोन्ही शिक्षकांची नावे आहेत. त्यांचा मित्र अनूप यालाही बेड्या ठोकल्यात आल्या आहेत. हे तिघे एका खासगी कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. पीडित मुलगी देखील याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला ब्लॅकमेल करत दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केला. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले की, सुरुवातीला नरेंद्रने नोट्स देण्याच्या बहाण्याने संपर्क साधला. त्यानंतर मैत्री झाली. नरेंद्रने एका दिवशी अनूपच्या खोलीवर बोलावले, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. आणि धमकी दिली. काही दिवसांनंतर संदीपनेही तिला त्रास देण्यास सुरुवात केली. जेव्हा तिने याला विरोध केला, तेव्हा त्याने तिला कथितपणे ब्लॅकमेल केले. नरेंद्रसोबतच्या प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संदीपनेही तिच्यावर बलात्कार केला. माहितीनुसार, अनूपने तिला त्याच्या खोलीत येतानाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून धमकावले आणि तिचा लैंगिक छळ केला.

पीडितेने यानंतर आपल्या आई-वडिलांना याबाबत सांगितले. एनडीटीव्हीच्या एका अहवालानुसार, कुटुंबाने कर्नाटक राज्य महिला आयोगाशी संपर्क साधला आहे. त्याशिवाय पोलिसांत याबाबतची तक्रार दिली असून तिघांना बेड्या ठोकल्यात आल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT