Eknath Shinde : निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

Mahayuti to include Republican Sena : एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन सेनेसोबत युती करत महायुतीची ताकद वाढवली आहे. मराठी आणि दलित मतदारांना आकर्षित करण्याची ही डावपेचात्मक खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Eknath Shinde and Anandraj Ambedkar announce political alliance : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज युतीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. दरम्यान आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, आज एक महत्त्वाची घोषणा अपेक्षित आहे. शिवसेना शिंदे गटात इतर पक्षातील नाराज नेत्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. मतांची जुळवाजुळव आणि आघाड्या मजबूत करण्यासाठी शिंदे गट मनसेसह इतर लहान पक्षांशी पडद्यामागे चर्चा करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना सर्व पक्ष आपली ताकद आजमावत आहेत. शिंदे यांनी आणखी एका पक्षाला सोबत घेतल्याची माहिती आहे.

Eknath Shinde
आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com