Three former TMC MPs, including Sushmita Dev, join BJP ahead of the Rajya Sabha elections in West Bengal. saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा मोठा धक्का! 3 माजी खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

West Bengal 3 Ex Tmc Mps Join Bjp Before Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे तीन माजी खासदार भाजपमध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

राज्यसभा निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तृणमूल काँग्रेसचे तीन माजी खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सुष्मिता देव, सुखेंदु शेखर रॉय आणि प्रकाश बारिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते शमिक भट्टाचार्य यांनी तिघांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे. भाजपकडून या तिघांना पुन्हा राज्यसभेत पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी 14 जुलै 2026 हा उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. या पक्षप्रवेशामुळे पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला असून पक्षाला खिंडार बसले आहे.

शमिक भट्टाचार्य म्हणाले, गेल्या ५० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये जी राजकारणाची पद्धत चालत होती, त्यात आधी ३४ वर्षे लेफ्ट फ्रंट आणि त्यानंतर टीएमसीचे शासन राहिले. या काळात राज्यातील विकास ठप्प झाला होता. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या राज्यसभेतील तीन खासदारांनी आधी टीएमसीमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज हे तिघे सुष्मिता देव, सुखेंदु शेख रॉय आणि प्रकाश बारिक भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

ते पुढे म्हणाले, गेल्या १५ वर्षांत पश्चिम बंगालमधील सर्व लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली. यावेळी बंगालमध्ये ९० टक्के लोकांनी मतदान केले. पंतप्रधान मोदी वारंवार सांगतात की, बंगालमधील नव्या पिढीला नव्या युगात सहभागी व्हावे लागेल. नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) चे खासदार आणि माजी टीएमसी खासदार युसूफ पठाण हेही पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांची भेट घेण्यासाठी नबन्ना येथे पोहोचले. पठाण यांच्या दौऱ्यापूर्वी अभिनेता प्रसेनजीत चटर्जी यांनीही प्रशासकीय मुख्यालयात मुख्यमंत्रीांची भेट घेतली होती. बंगाल दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रसेनजीत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर साईभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू,२० जण जखमी

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

SCROLL FOR NEXT