गेल्या 18 दिवसात साखरेच्या दरात तब्बल 18 रुपयांची वाढ झाली आहे.
दलित नेत्याचा अपमान अयोग्य, दोषींवर कारवाई करण्याची रामदास आठवलेंची मागणी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर सभा झाली होती.
या सभेनंतर काही लोकांनी सभा झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार दलित समाजातील नेत्याचा अपमान करणारा असून तो संविधानविरोधी आहे, असे ते म्हणाले
पालघरच्या दापचारी येथे सरकारकडून जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू
दापचारी येथील जागेची आज पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पाहणी केली .
पालघरच्या दापचरी येथील दुग्ध प्रकल्पाच्या 1395 एकरवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारली जाणार
राज्यातीलच नाही तर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास यावेळी रावल यांनी व्यक्त केला.
नागपूर
- अशोक सराफ यांच्या ८० व्या वर्षात पदार्पणानिमित्त आज नागपुरात भव्य नागरी सत्कार सोहळा.
- डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या भव्य सोहळ्याचे आयोजन...
- मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील अष्टपैलू योगदानाबद्दल करण्यात येणार सत्कार..
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सत्कार..
- ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात पुष्कर श्रोत्री साधणार अशोक मामांशी मनमोकळा संवाद.
- नागपूर मनपा, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम
यवतमाळ -
मोकाट जनावरामुळे दोन कारमध्ये भीषण अपघात
वृद्ध महिलेचा मृत्यू, तीन जण गंभीर
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील किन्ही जवळील घटना
रत्नागिरी - ‘तटकरे यांच्याकडे नेमका कोणता जादूटोणा?’; रामदास कदमांचा सवाल
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांच्या नियुक्तीचे स्वागत; मात्र ज्येष्ठतेचा योग्य सन्मान झाला पाहिजे, अशी कदमांची भूमिका
भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदाचे केले स्वागत
रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल रामदास कदमांकडून भरत गोगावले यांचे अभिनंदन.
रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार, मग पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला का?
मेजॉरिटीच्या आधारावर पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळायला हवे होते, अशी रामदास कदमांची खंत.
नागपूर -
- नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाचेर येथे ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
- विनोद लक्ष्मण सतीकोरसे असे मृत चालकाचे नाव आहे.
- विनोद सतीकोरसे हे ट्रॅक्टरने शेतातील काम आटोपून घरी परतत होते. यावेळी एका पुलाजवळ ट्रॅक्टरच्या मागे जोडलेला लोखंडी अँगल पुलाच्या संरचनेत अडकल्याने ट्रॅक्टर जागीच उलटून नाल्यात कोसळला.
- या अपघातात विनोद सतीकोरसे हे ट्रॅक्टरखाली दबले गेले. नाल्यातील पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
- सावनेर तालुक्यात होणाऱ्या डिफेन्स न्यूक्लियर एरोस्पेस (DNA) कॉरिडॉरला शेतकऱ्यांचा विरोध...
- 2730 हेक्टर जागा लागणार आहे...मात्र शेतकरी जमीन द्यायला तयार नाही... या विरोधात शेतकरी एकत्र आले आहे.
- सावनेर तालुक्यातील खुरसापार,जोगा, माळेगव सतरापूर ,सावळी ,सालई असे नऊ गावच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी समिती तयार करून एकत्र पोहचले आहे..
- तालुक्यात होऊ घातलेल्या एमआयडीसीच्या विरोधात आपल्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले...
सोलापुरातील ओबीसी बांधवांनी बुधवारी जात पडताळणी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विनंती केली. राज्यासह सोलापुरात बोगस कुणबी प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाला आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक जन कागदपत्रात खाडाखोड करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुदतवाढीनंतरही धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे, वाढलेला विमा हप्ता व नुकसान झाल्यानंतर मिळणारी कमी भरपाई तसेच विमा कंपन्यांच्या किचकट अटी-शर्तींमुळे शेतकऱ्यांमध्ये पिक विमा काढण्यासंदर्भात निरुत्साह दिसून आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रम शाळेतीलील विद्यार्थिनी ना झालेल्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेच्या वतीने नाशिकच्या येवला येथे तहसिल कार्यालयावर मोर्चा काढत,निर्दशने करण्यात येऊन निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत, “काही माणसं मार्ग चुकले होते, आता परत आले तर त्यांना मनापासून जवळ घेतलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया दिली. महापालिकेतील करवाढीला आमचा ठाम विरोध असून, भाजप आणि शिवसेनेत काय सुरू आहे यावर मत व्यक्त करण्याची गरज वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. महासभेत चर्चेला पुरेसा वाव मिळत नसल्याचा आरोप करत, आमचे मुद्दे लेखी स्वरूपात संबंधित पदाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
भंडारा जिल्ह्यात ओबीसींच्या विविध संघटनांनी एकत्रितपणे सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आज १०० वा दिवस पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नावे निवेदन सादर केले.
- हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीत ग्रामसभेदरम्यान राडा
- ग्रामसभा सुरू असतानाच दोन गटांत तुफान हाणामारी
- एका नागरिकाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर वाद उफाळल्याची माहिती
- गावातील रस्त्यावर सांडपाणी साचत असल्याने मुरूम टाकण्याची मागणी
- याच मुद्द्यावरून वाद वाढल्याचे सांगण्यात येत आहे
- ग्रामपंचायत सभागृहाबाहेरही नागरिकांमध्ये राडा
- हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
जुन्नरच्या पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून हत्या… या घटनेनंतर तिच्या शाळकरी मैत्रिणीही न्यायासाठी पुढे आल्या आहेत… ‘आमची चूक काय?’ असा सवाल करत चिमुकल्या मुलींनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय… तर जवळच राहणाऱ्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने परिसरातील सख्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे…
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेश भटके विमुक्त प्रकोष्ठ प्रभारी राजेश पांडे आणि प्रकोष्ठ प्रदेश संयोजक, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भटके विमुक्त जमाती प्रकोष्ठ प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रदेश सह-संयोजकपदी राजू साळूंके (रायगड), शिवाजी आव्हाड (ठाणे), पी.टी. चव्हाण (बीड) यांची तर अमोल बावणे (नाशिक), राजेश धोत्रे (पुणे), बाबुराव (तुळशिराम) केंद्रे (नांदेड) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकोष्ठ प्रदेश कार्यलय प्रमुखपदी राजेंद्र गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या आणि वाहन कर व इतर शासकीय थकबाकी न भरल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या सहा वाहनांचा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे.
या वाहनांचा ई-लिलाव शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुकांना www.mstcindia.co.in या संकेतस्थळावरून ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
गणेशोत्सवाला अजून काही दिवस बाकी असले तरी पुण्यात स्पीकर निर्बंधांवर गणेश मंडळांनी आक्षेप नोंदवत थेट पोलिस प्रशासनावर बोट दाखवलं आहे. पोलिसांना वर्षभर कुठले ही सण आणि दिवस दिसत नाहीत फक्त गणेशोत्सव आला की नवीन वर्ष नवीन नियमावली जाहीर केली जाते. आमच्यावर निर्बंध लावू नका, कार्यकर्त्याला सगळं माहिती असतं. अधिकारी येतात अधिकारी जातात, कार्यकर्त्याला सिव्हिक सेन्स शिकवू नका अशी भूमिका सुद्धा गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. प्रत्येक मंडळात ढोल ताशा लावता येईल एवढी पथकं शहरात उपलब्ध नाहीत तसेच त्यांचे पैसे मोठ्या मंडळांना परवडतात छोट्या मंडळांना नाही. आमचा प्लाझ्मा साउंड ला आमचा सुद्धा विरोध आहे पण पर्यावरणप्रेमींनी फक्त गणेशोत्सवात दिसतो का असा सवाल पण यावेळी विचारण्यात आला.
परभणीच्या कौसडी शिवारातील शेतात तीन वर्षीय चिमुकला बोरवेलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. अदनान शेख नदीम असे या चिमुकल्याचे नाव असून तो कौसडी येथील रहिवासी आहे. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अदनान शेतातील बोरवेलमध्ये पडला. अंदाजे दहा फूट खोलवर जाऊन तो अडकल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने बोरवेलच्या बाजूने खोदकाम करून चिमुकल्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तहसील प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर महानगरपालिकेचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात आले आहे. मात्र, या नामफलकावर उर्दू किंवा अन्य भाषेतही नामफलक लावण्यात यावा, अशी काही जणांकडून मागणी होत असून फलक बदलण्याचा किंवा त्यावर अन्य भाषेचा समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास यामुळे भाषिक तसेच प्रांतीय वाद निर्माण होऊन शहरातील वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. महानगरपालिकेच्या नामफलकावर केवळ मराठी भाषेचाच वापर करण्यात यावा, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
पुणे पोलिसांकडून काँग्रेस पक्षाला अटी शर्तींसह परवानगी
कार्यक्रम ठिकाणी ड्रोन ने छायाचित्रीकरण करण्यास बंदी
कार्यक्रमाचे स्टेज अतिसुरक्षित ठेवण्यात येणार
कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेतेबाबत योग्य ती कारवाई घेण्याचे सुद्धा पोलिसांकडून आयोजकांना सूचना
22 ऑगस्ट रोजी छात्रो की गुंज हा कार्यक्रम पार पडणार
पुण्यात अल्पवयीन तरुणाचा खून
पुण्यात ए आर ए आय च्या टेकडीवर अल्पवयीन तरुणाचा खून
अल्पवयीन तरुणाच्या डोक्यावर धारधार शास्त्राने वार
आज पहाटे किंवा मध्यरात्री घटना घडल्याचा पोलिसांना संशय
पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या केला असल्याचा सुद्धा पोलिसांना संशय
तळेगांव दाभाडे येथे प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृत्यूस डॉक्टरांच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना आता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची उघड लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहादा तालुक्यातील शेतकरी विजय पवार 10 क्विंटल गहू विक्रीसाठी नंदुरबार बाजार समितीत घेऊन आले होते.व्यापाऱ्याने गव्हाला प्रति क्विंटल 2 हजार 656 रुपये दर दिला मात्र शेतमाल स्वतःच्या जागेवर नेण्यासाठी शिफ्टिंग खर्च सांगून प्रति क्विंटल 20 रुपये अतिरिक्त कापून घेतले.
अवयव वेळेत पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करून रवाना..
धिरज यांचे डोळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दान करण्यात येणार...
एक किडनी रिम्स हॉस्पिटल अमरावती येथे प्रत्यारोपणासाठी देण्यात येणार...
दुसरी किडनी किंग्सवे हॉस्पिटल, नागपूर येथे नेण्यात येणार...
लिव्हर नागपूर येथील न्यू एरा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी नेण्यात येणार...
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडलंय.
- गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी STP प्लांटचे काम सुरू आहे.
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गावांचे सांडपाणी गोदावरीत जाणार नाही, यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार.
- सांडपाणी क्लीन करून नदीचे प्रदूषण कमी करण्यावर भर.
महापालिकेची पाणीपट्टी दरवाढी संदर्भात सुरू आहे महासभा
कोणत्याही परिस्थितीत दरवाढ करू नका या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक
महापालिकेच्या इमारतीत शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
महासभेच्या प्रेक्षक गॅलरीत घुसले शिवसैनिक
वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृद्धापकाळाने लडकत यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन
लडकत पुणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिले आहेत
चाकण MIDCच्या प्रश्नांवरून तरुणांचं उपोषण सुरू असतानाच आज चाकण-तळेगाव महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला… मात्र प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय… प्रश्न मार्गी न लागल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय
दहिवाळ शिवारात झाला अपघात
आयशर ट्रक-एसटी बस यांच्यात झाला अपघात
अपघातात 1 जण ठार तर 10 जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला,तर बस च्या पुढील भागाचे मोठे नुकसान
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल
जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात केले दाखल
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात आपण पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत,अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
आंबोली नांगरतास येथे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने व्हॅगनार कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील दोघे जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
- हिंगणघाट तालुक्यातील जामगाव गोविंदपूर शिवारातील शेतात सुरू होता जुगार
- पोलिसांनी छापा टाकून १९ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात
- रोख रक्कम, मोबाईल आणि वाहनांसह २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
- जुगार प्रकरणी १९ जणांविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साताऱ्यातील मलकापूर शहरातील शास्त्रीनगर येथे भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी एका मुलीवर हल्ला केला. रस्त्यावर चालत असताना एकाचवेळी 6 ते 7 कुत्र्यांनी हल्ला केल्याने मुलगी घाबरलेली पहायला मिळाली. यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने मुलीचा जीव वाचला.
निवडणूक आयोग बौद्धिक नक्षलवादी
पंतप्रधान मोदी, फडणवीस आणि शिंदे निवडणूक आयोगावर दबाव टाकतात
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नगरसेवक अमोल बालवडकर यांना त्यांच्या प्रभागातील विकास कामांसाठी स्थायी समितीने मंजूर केलेला निधीचा ठराव मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत रद्द करताना भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्षांची ठिणगी पडली. या निर्णयावरून सभागृहात खडाजंगी रंगली.
मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडा येथे भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने संरक्षक कठडा तोडून कार खाली सर्व्हिस रोडवरील दुचाकीवर कोसळल्याची थरारक घटना घडली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार व त्याच्या सोबत असलेली महीला कार व लोखंडी रेलिंगखाली अडकले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्परता दाखवत दोघांची सुटका केली आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दुचाकीस्वार इंद्रजीत बोडेकर याच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून, त्याला अधिक उपचारासाठी गोव्यातील बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नव्या पोलीस स्टेशनची 'अ', 'ब', 'क' अशी वर्गवारी केली जाणार
वर्गवारीनुसार पोलीस स्टेशनमधील पदभरती केली जाणार
सायबर गुन्हे, डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी विशेष मनुष्यबळ भरले जाणार
जिल्हा पातळीवर 'अ' वर्ग,तर तालुका पातळीवर 'ब' वर्ग पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार
तर 150 ते 200 गुन्हे असलेले पोलीस स्टेशनचा समावेश 'क' वर्गात केला जाणार
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेला आता विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे.. बाळासाहेब थोरात या विद्यापीठाचे कुलपती झाले असून, विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला..
डोंबिवली पश्चिमेकडील पादचारी पुलावर पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त अभिमान पवार, पथकप्रमुख विजय भोईर व कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात फेरीवाले, भिकारी व गर्दूल्ले यांच्या कारवाई केली. यार कारवाई दरम्यान काही फेरीवाल्यांनी पोलीसांशी वाद घातला.पालिका कर्मचाऱ्यांनी पादचारी पुलावरील फेरीवाल्यांचा माल जप्त केला आहे. मात्र मुबंऱ्याहून येणाऱ्या डोंबिवलीत व्यवसाय करणाऱ्या ह्या फेरीवाल्यावर कारवाई होताना दिसत नव्हतं कारवाई च्या दरम्यान फेरीवाल्यानी उच्छाद मांडला
पुण्यात भाजपचे बंडखोर नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रभागातलं बजेट चक्क 'झीरो' करण्यात आलंय...!!! याविरोधात अमोल बालवडकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय...मी मंञी चंद्रकांत पाटील या कोथरूड मतदारसंघातील निधीच्या चौकशीची मागणी केल्यानेच माझ्या वार्डातलं बजेट हे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी 'झीरो' केल्याचं बालवडकरांनी म्हटलंय तर महापौरांनी बालवडकरांचे आरोप फेटाळून लावलेत...याच मुद्यावरून बालवडकरांनी आज पालिका सर्वसाधारण सभेत आवाज उठवत वॉकआउट देखील केलंय.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचा तब्बल चारशे वर्षांचा ऐतिहासिक कंचनी महाल आज दुर्लक्षाच्या विळख्यात सापडला आहे. ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारी ही वास्तू आता पडझडीच्या उंबरठ्यावर असून, तिच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक आणि इतिहासप्रेमींकडून केला जात आहे. कंचनी नावाच्या नर्तिकेला मेहकरहून लोणारच्या कमळजा माता मंदिरावरील दिवा पाहण्याचा हट्ट होता. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्कालीन राजाने उंच महाल उभारल्याची आख्यायिका सांगितली जाते. मात्र, याच महालावरून दिवा पाहताना कंचनी खाली पडून तिचा मृत्यू झाल्याची कहाणीही आजवर चर्चेत आहे. इतिहासाची ही अमूल्य खूण आता नामशेष होण्याआधी तिचे तातडीने संवर्धन करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
सर्पदंशाच्या घटनांची शास्त्रशुद्ध नोंद ठेवून त्याआधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनाने घेतला निर्णय
शासकीय, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची आणि सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अथवा जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवावी लागणार
सर्पदंशाच्या वाढत्या घटनांचे संनियंत्रण, कारणांचा अभ्यास, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती यावर आरोग्य विभागाकडून भर देण्यात येणार
फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू
दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार
पारोळा, शिवरे दिगर येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेतील गोंधळामुळे ग्रामसेवक पी. एन. पाटील यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवरे दिगरच्या सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून, एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- आग विझवताना घटनास्थळी एक जळालेला मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्याची ओळख पटवणे कठीण...
- मृतदेह पुढील तपासासाठी नागपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
- प्रतापनगर पोलिसांसह फॉरेन्सिक पथकही तपासणी केली...प्राथमिक माहितीनुसार, आढळलेला मृतदेह एखाद्या भिक्षेकऱ्याचा असण्याची शक्यता..
- मात्र, मृताची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
- आग नेमकी कशामुळे लागली आणि मृत व्यक्तीची ओळख काय, याचा तपास प्रतापनगर पोलीस करत आहेत.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आता दोन शहराध्यक्ष
पुणे पश्चिम शहराध्यक्षपदी विशाल तांबे, तर पूर्व शहराध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती
शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व कॉंग्रेस पक्षाच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही शहरासाठी दोन शहराध्यक्ष नियुक्तीची भूमिका
त्यानुसार पुणे शहर पश्चिम शहराध्यक्षपदी विशाल तांबे यांची, तर पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांची शहराच्या पूर्व शहराध्यक्षपदी नियुक्ती
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील नियमभंगाच्या तक्रारीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.२० मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आले होते. या निवडणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.मात्र, मागील दोन ते अडीच महिन्यांपासून या तक्रारीवर सुनावणी झालेली नाही. लेखी विनंती करूनही सुनावणीची तारीख मिळत नसल्याने,आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती तक्रारदारांचे वकील ॲड. दत्तात्रय घोडके यांनी दिली आहे
कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा चौक येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून रस्ता रोको केल्याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात आमदार संग्राम जगताप यांच्यासह दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली काळदात फाटा चौक येथे हे आंदोलन झाले. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करून श्रीगोंदा ते जामखेड आणि कर्जत ते मिरजगाव रस्त्यावरील वाहतूक अडवण्यात आली होती. यामुळे प्रवाशांची अडचण झाली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी बळीराम गोपीनाथ काकडे यांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून आमदार संग्राम जगताप, धवलसिंह मोहिते, यांच्यासह इतर 100 ते 150 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनावर टीकेची तोफ डागली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित गट-ब दुय्यम सेवा २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक मुख्य परीक्षेच्या निकालात महाज्योती, नागपूरच्या १२३ बहुजन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
राज्य कर निरीक्षक पदाच्या एकूण २८० जागांपैकी १०१ जागांवर ‘महाज्योती’चे विद्यार्थी यशस्वी
- मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील अष्टपैलू योगदानाबद्दल गौरव.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा सत्कार
- नागपूर मनपा, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम
- सायंकाळी ६.३० वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सोहळा.
- ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात पुष्कर श्रोत्री साधणार अशोक मामांशी मनमोकळा संवाद.
- प्रदीर्घ कलाप्रवासातील आठवणींना मिळणार उजाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.