Bollywood Actor : "३ महिन्याच्या लेकीचा मृत्यू..."; प्रसिद्धीच्या शिखरावर असताना बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर, जुना किस्सा होतोय व्हायरल

Govinda -Sunita Ahuja 3 Month Old Daughter Passed Away : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांचा एक जुना व्हिडीओ पुन्हा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यात ते आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगताना दिसत आहे.
Govinda -Sunita Ahuja 3 Month Old Daughter Passed Away
Bollywood ActorSAAM TV
Published On
Summary

गोविंदा हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.

गोविंदा-सुनीता आहुजा वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहे.

गोविंदा-सुनीता आहुजाने आपल्या तीन महिन्याच्या मुलीला गमावले होते.

बॉलिवूडचा हिरो गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल सोशल मीडियावर अनेक गोष्टी बोलल्या जातात. अशात आता गोविंदा आणि सुनीता यांच्या आयुष्यातील भूतकाळातील एक भावुक प्रसंग समोर आला आहे. १९८७ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्याच्या एका अपत्याच्या निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सध्या प्रसंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उषा काकडे यांचे यूट्यूब चॅनेल आणि हॉटरफ्लाईला दिलेल्या जुन्या मुलाखतीमध्ये हा प्रसंग या जोडप्याने सांगितला. गोविंदा आणि सुनीता यांना १९८९ मध्ये टीना ही मुलगी झाली आणि त्यानंतर १९९७ मध्ये यशवर्धन हा मुलगा झाला. मात्र, या दोन मुलांच्या जन्माच्या दरम्यान, या जोडप्याने एका मुलीला गमावले होते. टीनाच्या जन्मानंतर सुनीता आणि गोविंदा यांना आणखी एक मुलगी झाली, परंतु तिचा जन्म प्री-मॅच्युअर झाला होता. तिची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झाली नव्हती आणि अवघ्या तीन महिन्यांच्या असतानाच तिचे निधन झाले. या घटनेचा या जोडप्यावर खोलवर परिणाम झाला आणि या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली.

एका जुन्या मिडिया मुलाखतीत गोविंदाने या दुःखद अनुभवाबद्दल सांगितले होते की, त्याच्या आईने त्याला मुलीचा मृतदेह नर्मदा नदीत विसर्जित करण्यास सांगितले होते. आपल्या मृत बाळाला स्वतःच्या हातांनी वाहून नेणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक अनुभव ठरला. आपल्या तीन महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर सुनीता आहुजाने आपला मुलगा यशवर्धन याला खूप जपले. त्याचे लाड देखील केले.

Govinda -Sunita Ahuja 3 Month Old Daughter Passed Away
Famous Actress : हिऱ्याची अंगठी अन् मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक मिठी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटो व्हायरल

गोविंदा करिअर

गोविंदा हा बॉलिवूचा सुपस्टार आहे. त्याच्या स्टाइल आणि अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. गोविंदाने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यात 'आँखें' (१९९३), 'हिरो नं. १' (१९९७), 'साजन चले ससुराल' (१९९६), 'राजा बाबू' (१९९४), 'कुली नं. १' (१९९५), 'दुल्हे राजा' (१९९८) आणि 'पार्टनर' (२००७) यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. चाहते आता गोविंदाचा आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे अलिकडेच सुनीता आहुजा 'लॉकअप २'मध्ये दिसल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com