Shreya Maskar
तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत मस्त बाहेरगावी फिरायला जाण्याचा प्लान करा. अहिल्या किल्ला हे बेस्ट ऑप्शन ठरेल.
मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 'अहिल्या किल्ला' वसलेला आहे. हा २५० वर्षे जुना किल्ला आहे.
नर्मदा नदीच्या काठावर दिमाखात उभा असलेला हा किल्ला आता एका 'बुटीक हेरिटेज हॉटेल'च्या रूपात पर्यटकांच्या सेवेत आहे.
पवित्र नर्मदा घाट, हातमागावरील विणकामासाठी प्रसिद्ध असलेली 'रेहवा सोसायटी', 'लाबुझ कॅफे' 'अहिल्या वाडा' (राणींचे निवासस्थान आणि दरबार), नदीकाठचे विहंगम घाट, विविध मंदिरे आणि ऐतिहासिक 'राजवाडा' हे येथील मुख्य आकर्षण आहेत.
अहिल्या किल्ला हा १८ व्या शतकात मराठा साम्राज्याच्या प्रसिद्ध राणी अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होता. हा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
अहिल्या किल्ल्याच्या भिंती आणि दरवाजांवर घोडे, हत्ती आणि पौराणिक कथांचे सुरेख कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. तुम्हाला येथे सुंदर वास्तुकला पाहायला मिळेल.
नर्मदा नदीच्या पात्रात बोटीतून फिरताना किल्ल्याचे आणि घाटाचे विहंगम दृश्य दिसते. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.