Lock Upp 2: रितेश देशमुख आणि फराह खान सूत्रसंचालन करत असलेल्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लॉक अप २'मध्ये दर आठवड्याला नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता या शोच्या आगामी 'जजमेंट डे' एपिसोडचा प्रोमो समोर आला असून, त्यात बॉलिवूड अभिनेता गोविंदाची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे. हा भाग शनिवारी, ११ जुलै रोजी प्रसारित होणार असून, प्रोमोने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे.
प्रोमोमध्ये गोविंदा स्टेजवर येताच सुनीता आहुजाला मोठा धक्का बसल्याचे दिसते. स्टेजवर आल्यानंतर ते रितेश देशमुख आणि फराह खान यांच्याशी संवाद साधताना म्हणतो, 'हे लॉक अप डोळ्यांना दिसतं, पण मी अशा लॉकअपमधून आलो आहे जे कुणालाच दिसत नाही.' त्याच्या या वक्तव्यानंतर फराह त्याची विचारपूस करते.
फराह खान गोविंदाला थेट प्रश्न विचारते, 'तुम्हाला गोळी मारण्यासाठी तिने कॉन्ट्रॅक्ट का दिलं होतं?' यावर गोविंदा मिश्कील अंदाजात उत्तर देतात, 'मी स्वतःच ती गोळी घेऊन आलो आहे. तिला माझ्या छातीत गोळी झाडायची होती.' त्याच्या या वक्तव्यानंतर फराहही आश्चर्यचकित होते. प्रोमोमध्ये तो असं का म्हणाला याचं नेमकं कारण एपिसोड प्रसारित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सुनीता आहुजाने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये आणि रिअॅलिटी शोमध्ये गोविंदांना चुकून गोळी लागल्याच्या घटनेवर मस्करी केली होती. 'लाफ्टर शेफ्स' या कार्यक्रमात तिने गोविंदांची फिरकी घेताना, 'खरा नायक आपल्या पत्नीचा आदर करतो. तो नजरेने गोळ्या झाडेल, पण तिसरी व्यक्ती मध्ये आले की गुडघ्यावर गोळी मारतो," असे म्हणत वातावरण हलकेफुलके केले होते.
यापूर्वी 'लॉक अप २'मध्ये सुनीता आहुजाने गोविंदाच्या अफेअरवर अनेक कमेंट केल्या होत्या. मात्र, दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शिंदेने गोविंदावर केलेल्या ट्रोलिंगवर ठामपणे विरोध करत पतीची बाजूही घेतली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.