Actor Death: मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत पेट्रोल पंपावरच मृत्यू; नेमकं काय घडलं

Actor Death: 'आरंभी' मालिकेतील कलाकाराचे १३ तासांचे शूटिंग पूर्ण करून घरी जाताना पेट्रोल पंपावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेने मनोरंजनविश्व हळहळले आहे.
dr Aarambhi serial sanjib singh passes away
dr Aarambhi serial sanjib singh passes away Saam Tv
Published On

Actor Death: टीव्ही मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कलर्स टिव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'आरंभी' मध्ये ज्युनिअर कलाकार म्हणून काम करणारा प्रसिद्ध अभिनेता संजिब सिंगचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५१ वर्षीय संजिब सलग १३ तासांचे शूटिंग पूर्ण करुन घरी जात असताना पेट्रोल पंपावर अचानक प्रकृती बिघडल्यामुळे जागेवरच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजिब सिंग गेल्या जवळपास ३० वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात ज्युनिअर कलाकार म्हणून कार्यरत होता. तो सध्या 'आरंभी' या मालिकेत काम करत होता. त्याच्या शूटिंगची शिफ्ट दुपारी २ वाजता सुरू होऊन रात्री ३ वाजेपर्यंत चालली होती. शूटिंगदरम्यान त्याला बरं वाटतं नसल्याचे सहकाऱ्यांना सांगितले होते आणि थोडा वेळ विश्रांतीही घेतली होती. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर तो स्वतःच्या दुचाकीने घरी निघाला.

dr Aarambhi serial sanjib singh passes away
Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

घरी जाताना तो पेट्रोल भरण्यासाठी एका पेट्रोल पंपावर थांबला. याच ठिकाणी अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळले. घटनास्थळी उपस्थितांनी तातडीने मदत केली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका हे निधनाचे कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट होईल असे डॉक्टर म्हणाले आहे.

dr Aarambhi serial sanjib singh passes away
Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

संजिब सिंग मूळचा कोलकात्याचा रहिवासी होता. त्याचे लग्न झाले नव्हते. त्याच्या पश्चात आजारी भाऊ आणि घटस्फोटित बहीण असा परिवार आहे. त्याचे पार्थिव शवविच्छेदनानंतर विमानाने कोलकात्याला पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) ने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संस्थेने निर्मात्यांकडे संजिब सिंगच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि योग्य भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, खूप वेळ चालणाऱ्या शूटिंग शिफ्ट, कलाकारांच्या आरोग्याची काळजी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com