Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

Actress Court Fine: कार्यक्रमाला ऐनवेळी अनुपस्थित राहिल्याप्रकरणी नाशिक जिल्हा ग्राहक आयोगाने ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी मोठा दणका. मानधन परत करण्यासह मानसिक त्रासासाठी एकूण ४.२५ लाख रुपये भरपाईचे आदेश दिले.
moushumi chatterjee
moushumi chatterjee Saam Tv
Published On

Actress Court Fine: बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी सध्या मोठ्या अडचणीत अडकल्या आहेत. कार्यक्रमासाठी सर्व सुविधा आणि मानधन देऊनही ऐनवेळी उपस्थित न राहिल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. आयोगाने त्यांना तीन लाख रुपयांचे मानधन तसेच नऊ टक्के वार्षिक व्याजासह भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिकच्या सेवानिवृत्त शासकीय अधिकारी डॉ. अरुणा वानखेडे वय वर्ष ७४ यांनी यासंदर्भात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, १८ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये सहकाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मौसमी चॅटर्जी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

moushumi chatterjee
Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

तीन लाख रुपयांच्या मानधनावर घेऊन त्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होत्या. त्यानुसार दोन लाख रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आले, तर उर्वरित एक लाख रुपये गोव्यात पोहोचल्यानंतर रोख स्वरूपात देण्यात आले. याशिवाय अभिनेत्री आणि त्यांच्या सहाय्यकासाठी मुंबई-गोवा विमानप्रवासाची तिकिटे तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली होती.

moushumi chatterjee
'वडील आणि भावाला चुकीचं वाटेल असं काम करणार नाही...'; न्यूड सीन करण्याबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट वक्तव्य

१७ नोव्हेंबर रोजी मौसमी चॅटर्जी गोव्यात पोहोचल्या. मात्र, डॉ. वानखेडे त्यांच्या दुखापतीमुळे स्वतः विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. याच कारणासह काही अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत मौसमी चॅटर्जी यांनी दुसऱ्या दिवशी नियोजित कार्यक्रमाला उपस्थित न राहता मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम रद्द झाल्यानंतर डॉ. वानखेडे यांनी ई-मेलद्वारे वारंवार संपर्क साधून मानधन परत करण्याची मागणी केली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी ॲड. दीप्ती नाशिककर यांच्या माध्यमातून नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली.

सुनावणीदरम्यान आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा डोळहारकर यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. संपूर्ण मानधन आणि इतर सुविधा स्वीकारल्यानंतर कार्यक्रमाला अनुपस्थित राहणे ही सेवेतील गंभीर बाब असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. यानंतर आयोगाने मौसमी चॅटर्जी यांना तीन लाख रुपयांचे मानधन नऊ टक्के वार्षिक व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासासाठी एक लाख रुपये आणि खटल्याचा खर्च म्हणून २५ हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com