'वडील आणि भावाला चुकीचं वाटेल असं काम करणार नाही...'; न्यूड सीन करण्याबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट वक्तव्य

Actress Nude Scenes: ‘टॉक्सिक’ चित्रपटावरील वादावर हुमा कुरेशीने प्रतिक्रिया देत आधी चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं. तसेच, न्यूड सीनबाबतही तिने स्पष्ट भूमिका मांडत कुटुंबाचा आदर महत्त्वाचा असल्याचं सांगितलं.
Actress Nude Scenes
Actress Nude ScenesSaam Tv
Published On

Actress Nude Scenes: अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिच्या दोन महत्त्वाच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. एकीकडे तिचा अॅक्शनपट ‘बेबी डू डाय डू’ नुकताच प्रदर्शित झाला आहे, तर दुसरीकडे ती दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक’ चित्रपटाचाही महत्त्वाचा भाग आहे. या दोन्ही चित्रपटांमुळे चर्चेत असलेल्या हुमाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘टॉक्सिक’भोवती सुरू असलेल्या वादावर आणि न्यूड सीनबाबतच्या तिच्या भूमिकेवर स्पष्ट मत व्यक्त केलं.

‘बेबी डू डाय डू’ची बॉक्स ऑफिसवर आलिया भट्ट आणि शरवरी वाघ यांच्या ‘अल्फा’शी टक्कर होत आहे याबद्दल एका मुलाखतीत बोलताना हुमा म्हणाली, सध्या महिलाप्रधान अॅक्शन चित्रपटांसाठी उत्तम वातावरण निर्माण झालं आहे. प्रेक्षकांना विविध प्रकारच्या दमदार महिला व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहे.

Actress Nude Scenes
Ranveer Singh: आलिशान घर, लक्झरी कार...; इतक्या कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे रणवीर सिंग

दरम्यान, यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाचा टीझर आणि काही सीनवर सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेबाबतही हुमाने आपलं मत मांडलं. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, कोणत्याही चित्रपटावर तो प्रदर्शित होण्यापूर्वी टीका करणं योग्य नाही. प्रेक्षकांनी आधी संपूर्ण चित्रपट पाहावा आणि त्यानंतरच त्याबद्दल मत व्यक्त करावं. अपूर्ण माहितीच्या आधारे कलाकार किंवा चित्रपटाबद्दल निष्कर्ष काढणं योग्य नसतं.

Actress Nude Scenes
Hemant Dhome: 'नावाला जागला, मिसिंग झाला'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील दुर्घटनेनंतर हेमंत ढोमेचा चार शब्दांत टोला, पोस्ट व्हायरल

याशिवाय, हुमाने आपल्या करिअरमध्ये न्यूड सीन न करण्याचा निर्णयही पुन्हा एकदा सांगितला आहे. या निर्णयामागचं कारण सांगताना ती म्हणाली, “माझे वडील, भाऊ आणि संपूर्ण कुटुंब आहे. त्यांना संकोच वाटेल किंवा अस्वस्थ वाटेल, असं कोणतंही काम मला करायचं नाही. कुटुंबाच्या भावना आणि मूल्यांचा आदर राखणं माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. असल्याचं तिने सांगितलं. मात्र, याचवेळी हुमाने इतर कलाकारांच्या निर्णयाचाही आदर व्यक्त केला. “अनेक कलाकार न्यूड सीन करतात आणि त्यामध्ये ते सहज असतात. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि मी त्याचा पूर्ण आदर करते,” असं ती म्हणाली.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com