'धुरंधर' फेम अभिनेत्रीच्या साखरपुड्याची चर्चा
अभिनेत्रीने मिस्ट्री मॅनसोबत शेअर केले रोमँटिक फोटो
फोटोंमध्ये अभिनेत्री फ्लॉन्ट करतेय डायमंड रिंग
मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 'धुरंधर' स्टार आयशा खान आहे. आयशा खानने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमुळे तिच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे.
आयशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती एका मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक पोज देत बोटातील हिऱ्याची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या पोस्टला "एखाद्या स्वप्नासारखं..." असे कॅप्शन दिले असून त्यापुढे अंगठीचा आणि पांढऱ्या हार्टचा इमोजी शेअर केला आहे. आयशाने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. एका युजरने लिहिलं की, "अभिनंदन..." तर दुसऱ्या युजरने लिहिलं, "ज्वेलरी प्रोमोशन..." फोटोत आयशा मिस्ट्री मॅनला मिठी मारताना, त्याच्यासोबत समुद्रकिनारी वेळ घालवताना दिसत आहे.
सोशल मीडियावर एकीकडे आयशाच्या साखरपुड्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे असे ही बोले जात आहे की, हे ज्वेलरी ब्रँडचे शूट आहे. कारण आयेशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने त्या ब्रँडचे नावदेखील नमूद केले आहे. त्यामुळे आयशाने साखरपुडा केला की हे ब्रँड शूट याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. अभिनेत्रीने अद्याप तिच्या साखरपुड्याबद्दल किंवा लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
आयशा खानला 'धुरंधर' मुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिचे 'शरारत' गाणे खूपच गाजले. तसेच आयशा खान 'बिग बॉस १७' ची सदस्य राहिली आहे. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.