Palak Muchhal : स्मृती मानधना-पलाश मुच्छलच्या लग्नाबद्दल महत्त्वाची अपडेट, बहीण पलक मुच्छल काय म्हणाली?

Palak Muchhal On Smriti-Palash Wedding : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. बहीण पलक मुच्छलने यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Palak Muchhal On Smriti-Palash Wedding
Palak MuchhalSAAM TV
Published On
Summary

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.

स्मृती-पलाशच्या लग्नाबद्दल बहीण पलक मुच्छलने मोठी अपडेट दिली आहे.

पलक मुच्छल एक प्रसिद्ध गायिका आहे.

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न स्मृतीच्या वडीलांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर एका मागोमाग अनेक घटना घडल्या आहेत. आता अखेर पलाशची बहीण पलक मुच्छलने यावर मौन सोडले आहे. पलक मुच्छल आणि पलाश मुच्छल हे दोघे गायक आहेत. पलक मुच्छलने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

पलकने सांगितले की,"गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही कुटुंब तणावात आहेत. प्रत्येकजण या परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे." पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात. फिल्मफेअरशी बोलताना पलक मुच्छल म्हणाली की, "अलिकडेच आमच्या कुटुंबाने कठीण काळाचा अनुभव घेतला आहे. अचानक घडलेल्या घटनांचा दोन्ही कुटुंबांवर गंभीर परिणाम झाला आहे. पण आम्ही शक्य तितके सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहोत. स्ट्राँग आहोत. "

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल 23 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार होते. मात्र त्यांचा शाही विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला. स्मृती मानधनाच्या वडीलांना हार्ट अटॅक आल्यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले. स्मृती आणि पलाश तब्बल 6 वर्ष एकमेकांना डेट करत होते. स्मृतीच्या वडीलांना तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर काही वेळाने पलाशची तब्येत देखील बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर स्मृतीने लग्नाचे संबंधित सर्व फोटो, पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्या.

काही दिवसांनी पलाश मुच्छल स्मृती मानधनाला धोका देत असल्याचे बोले जाते. सोशल मीडियावर पलाशसोबत एका महिलेचे फ्लर्टी चॅट्स तुफान व्हायरल होत आहेत. हे स्क्रीनशॉट खरे की खोटे याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर अमिता मुच्छल यांनी सांगितल्यानुसार, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बरी होत नाही, तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय हा पलाशने घेतला. पलाशचे स्मृतीच्या वडीलांशी चांगले नाते आहे.अशात आता अलिकडेच पलाश मुच्छल वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला. तेथे, तो मास्क घालून भक्तांमध्ये बसलेला दिसला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.

Palak Muchhal On Smriti-Palash Wedding
Tejaswini Lonari Wedding : "नवरी नी नवऱ्याची स्वारी..."; सरवणकरांचा लेक अडकला लग्न बंधनात; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत आयुष्याची नवीन इनिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com