लाडकी बहीण श्रीमंत होणार? लाडकीचा पगार घसघशीत वाढणार? पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची शिफारस

Ladki Bahin Yojana Benefit Increase Maharashtra: राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे... पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. या सूचनांनुसार, राज्यातील पात्र लाडकींना मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. पाहूया यावरचा एक रिपोर्ट...
Women beneficiaries of Maharashtra’s Ladki Bahin Scheme may soon receive increased financial assistance as the government reviews the ₹1500 monthly benefit.
Women beneficiaries of Maharashtra’s Ladki Bahin Scheme may soon receive increased financial assistance as the government reviews the ₹1500 monthly benefit.saam tv
Published On

महाराष्ट्रातील लाडकींना मोठी पगारवाढ मिळण्याची चिन्ह् आहेत. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पैसै वाढण्याची शिफारस करण्य़ात आलीय. आणि ही शिफारस थेट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं केलीये. या योजनेचे मूल्यमापन करून त्यात आवश्यक ते बदल केले जावेत, अशा सूचना या समितीनं केली आहे. सध्या योजनेतून मिळणारा लाभ पुरेसा आहे की नाही, याचं मूल्यमापन करून यात बदल करावा, असा सल्लाही समितीनं दिलाय.

लाडकींचे पैसे वाढणार?

वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेच्या 1500 रुपयांच्या रकमेचा पुनर्विचार होणार

महाराष्ट्रातील 'लाडकी बहीण योजने'चं केंद्राकडून सविस्तर मूल्यमापन

थेट बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चात 46% वाढ

पैशांचा मुख्य वापर जीवनशैली सुधारणं, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी

आर्थिक वर्ष 2026 पर्यंत देशातील 12 कोटी महिलांना योजनांचा थेट लाभ

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या शिफारसींनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. खरंतर, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्यानं अनेक अर्थतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलीये. त्यातच आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रासह ओडिशातील सुभद्रा योजनेचंही सविस्तर मूल्यमापन करण्यात आलंय. तर दुसरीकडे, राज्य सरकारनं याआधीच या योजनेतील तब्बल 80 लाख महिलांना अपात्र केलंय. त्यामुळे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं केलेल्या शिफारशींबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडं राज्याचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com