Manasvi Choudhary
साखरेचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरते. साखर अतिप्रमाणात खाल्ल्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
साखरेमध्ये अतिरिक्त कॅलरीज असतात, ज्या शरीरात फॅट्स म्हणून शरीरात साचून राहतात. सतत जास्त साखर खाल्ल्याने मेटाबॉलिझम मंदावतो आणि लठ्ठपणाचा धोका वेगाने वाढतो.
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते यामुळे रक्तातील साखरेची पातळी बिघडते आणि मधुमेह होण्याचा मोठा धोका वाढतो.
साखरेमुळे शरीरात अनेक बदल होतोत. त्वचेवरील कोलेजन कमी होते. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पिंपल्स आणि अकाली सुरकुत्या पडून त्वचा निस्तेज दिसते.
अतिसाखरेमुळे रक्तामध्ये खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
जास्त गोड खाल्ल्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. एकाग्रतेचा अभाव, वारंवार मूड स्विंग होणे, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमजोर होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.