Andhra Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: धावत्या कारने डिव्हायडरला धडक देत घेतला पेट, ४ जण जिवंत जळाले

Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशमध्ये भीषण कार अपघात झाला. भरधाव कारने डिव्हायडरला धडक देत पेट घेतला. या आगीत होरपळून ४ जणांचा मृत्यू झाला.

Priya More
  • आंध्र प्रदेशातील विजयवाडा बायपासवर कारला भयंकर अपघात

  • भरधाव कारची डिव्हायडरला धडक देत भीषण आग

  • आगीत होरपळून चौघांचा मृत्यू

  • विजयवाडा वेस्ट बायपास अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. भरधाव कारने डिव्हायडरला धडक देत पेट घेतला. या आगीमध्ये कारमध्ये असलेले ४ जण जिवंत जळाले. एनटीआर जिल्ह्यातील विजयवाडा वेस्ट बायपासवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कार्यक्रमासाठी ५ जण कारने नाम्बुरू येथे गेले होते. हा कार्यक्रम आटपून ते पुन्हा घराच्या दिशेने येत असताना हा भीषण अपघात झाला. भरधाव कारने आधी डिव्हायडरला धडक दिली त्यानंतर पेट घेतला. कारमध्ये असणारे ४ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भररस्त्यावर कार आगीचा गोळा बनली. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते ते नुन्ना भागात राहत होते. अपघातामध्ये ३९ वर्षीय कोमारेड्डी रामदेव, त्यांची आई अरुणा, नातेवाईक विजया आणि एका मुलाचा मृत्यू झाला.

दरम्यान, मागच्या महिन्यात आसाममधील नागाव जिल्ह्यातील ओल्ड गुडम भागातील केनापट्टी येथे अशीच अपघाती घटना घडली होती. विजेच्या खांबाला धडकल्यानंतर कारला आग लागली होती. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता आणि इतर दोघे गंभीर जखमी झाले होते. ते अरुणाचल प्रदेशहून गुवाहाटीला प्रवास करत होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर रस्त्यावरील एका खांबाला धडकल्यानंतर कार उलटली. या धडकेनंतर कारला आग लागली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buttermilk Vs Curd: ताक की दही, उपवासाला कोणता पर्याय फायदेशीर?

Kidney Stones : किडनी स्टोनचा धोका टाळायचाय? रोज प्या 'इतके' ग्लास पाणी

Cardiac Arrest First Aid: घरात कुणी अचानक बेशुद्ध पडलं तर काय कराल? पहिल्या ५ मिनिटांत करा हे ७ उपाय

Health Checkup30s: वयाच्या तिशीत येताय? या टेस्ट करा, संकट येण्याआधीच लागेल चाहूल

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT