Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

Bigg Boss 20 Second Wild Card Entry : 'बिग बॉस २०' च्या घरात दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धकाला पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
Bigg Boss 20 Second Wild Card Entry
Bigg Boss 20SAAM TV
Published On: 
Summary

'बिग बॉस २०' च्या घरात २ वाइल्ड कार्ड एन्ट्री

सलमान खानने स्पर्धकांना दिला धक्का

अमन गांधीची एक लाइफलाइन गेली

'बिग बॉस २०'मध्ये या आठवड्यात 'वीकेंड का वार' चांगलाच रंगला. सलमान खानने घरातील सदस्यांना खास सरप्राइज दिले. घरात दोन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे, ज्यामुळे सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. शनिवारी घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता मनीष गोयलची एन्ट्री झाली. तर रविवारी सोशल मीडिया स्टार घरी आला आहे.

'बिग बॉस २०' च्या घरात दुसरा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नकुल धुलने एन्ट्री घेतली आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आता नकुल धुल आणि मनीष गोयल घरात कोणता राडा घालणार, कसा गेम खेळणार हे सर्वच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिच घरात अनेक गट झालेले पाहायला मिळत आहे. नकुल-मनीष कोणता गेम प्लान आखणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

नकुल धुल कोण आहे?

मीडिया रिपोर्टनुसार, नकुल धुल हा हरियाणातील एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे. तो 'मिट्ठू डॉन' या नावाने ओळखला जातो.विनोद, मीम्स, भाष्य (commentary) असलेल्या आपल्या व्हिडिओंमुळे त्याने ऑनलाइन जगात १० लाख फॉलोअर्स पेक्षा जास्त मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तो यूट्यूब आणि इंस्टाग्रामसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला कंटेंटपोस्ट करतो.मात्र, अलिकडेच त्याचा महिलांविषयीचे विधान असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, ज्यामुळे नकुल चर्चेत आला आहे.

Bigg Boss 20 Second Wild Card Entry
Drishyam 3 OTT : थिएटरनंतर ओटीटीवर रंगणार 'दृश्यम ३'चा थरार, अजय देवगनचा चित्रपट कधी अन् कुठे पाहता येणार?

'बिग बॉस २०' हा शो जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीवर पाहायला मिळतो. या 'वीकेंड का वार'मध्ये अमन गांधीची एक लाइफलाइन जाते. येणाऱ्या 'वीकेंड का वार'मध्ये घरातील कोणता सदस्य निरोप घेणार पाहणे महत्त्वाचे आहे. 'बिग बॉस २०' च्या घरात १६ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली होती. त्यातील रोहेद खान , ईशा रिखी, रिती तिवारी घराबाहेर पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com