Vinod Kambli: मुंबईतल्या पॉश एरियात आलिशान घर, तरीही विनोद कांबळी वृद्धाश्रमात का राहतो?

Vinod Kambli: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी ठाण्यातील केअर सेंटरमध्ये उपचार घेत असल्याने चर्चेत आहेत. कधी काळी आलिशान घरात राहणारे कांबळी सध्या केअर सेंटरमध्ये का आहेत, जाणून घ्या.
Vinod Kambli
Vinod KambliSaamTv
Published On: 

Vinod Kambli: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ठाण्यातील ‘निदान सेंटर फॉर एल्डरली केअर’मधील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार कांबळी कायमस्वरूपी वृद्धाश्रमात राहत नसून, उपचार आणि काळजीसाठी या केअर सेंटरमध्ये दाखल झाले होते.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कांबळी केअर सेंटरमधील स्वच्छता, सुविधा आणि कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या काळजीचे कौतुक करताना दिसतात. या ठिकाणी आपल्याला घरापासून दूर असल्यासारखे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडिओमध्ये त्यांना बोलताना त्रास होत असल्याचे चाहत्यांची दिसत आहे.

Vinod Kambli
Shivali Parab: 'नाजूक ही नार...'; मराठमोळ्या लूकमध्ये शिवाली परबचं खुललं सौंदर्य

उपचारासाठी केअर सेंटरमध्ये

कांबळी यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना देखभालीची गरज असल्याचे सांगितले आहे. ‘निदान’च्या संस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळी काही काळ या ठिकाणी राहिले होते. त्यांना फिजिओथेरपी आणि डायबिटीस संबंधित उपचार देण्यात आले. सुरुवातीला त्यांना उभे राहण्यासही त्रास होत होता, मात्र उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कांबळींचे मित्र मार्कस कुटो यांनी अलीकडे त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार कांबळी गरजेनुसार रुग्णालय आणि केअर सेंटरमध्ये जातात आणि कुटुंबीयांच्या विनंतीनुसार त्यांना घरीही नेले जाते. त्यामुळे ‘कांबळींना घर नाही म्हणून ते वृद्धाश्रमात राहतात’ असा थेट निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

Vinod Kambli
Akshaye Khanna: अक्षय खन्नाने मुंबईच्या पॉश भागात घेतला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क

कधी काळी ८ कोटींच्या घरात वास्तव्य

विनोद कांबळी यांनी भारतीय क्रिकेटमध्ये यशस्वी कारकीर्द घडवली होती. या काळात त्यांच्याकडे प्रसिद्धीसोबतच आर्थिक स्थैर्य आणि आलिशान जीवनशैलीही होती. माध्यमांच्या वृत्तांनुसार ते मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील सुमारे ८ कोटी रुपये किमतीच्या आलिशान घरात राहत होते. त्यांच्या या घराचीही यापूर्वी बरीच चर्चा झाली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांच्या आयुष्यात आरोग्याशी संबंधित अनेक चढ-उतार आले. २०२४ मध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी बातम्या समोर आल्या. त्यांच्या पत्नी अँड्रिया हेविट यांनी यापूर्वी त्यांच्या आरोग्याबाबत पसरलेल्या काही दाव्यांना फेटाळले होते आणि कांबळी ठीक असल्याचे सांगितले होते.

अशी होती क्रिकेट कारकीर्द

विनोद कांबळी हे सचिन तेंडुलकर यांचे बालपणीचे मित्र आणि भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९९१ ते २००० या कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com