Shivali Parab: 'नाजूक ही नार...'; मराठमोळ्या लूकमध्ये शिवाली परबचं खुललं सौंदर्य

Shruti Vilas Kadam

ब्लॅक साडीची निवड

अभिनेत्री शिवाली परबने काळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून, साडीवर सिल्व्हर आणि हिरव्या रंगाच्या आकर्षक डिझाइनची बॉर्डर आहे.

Shivali Parab

मरून रंगाचा आकर्षक ब्लाऊज

शिवालीने मरून रंगाचा स्टायलिश ब्लाऊज परिधान केला आहे. पफ स्लीव्हजमुळे तिच्या लूकला हटके आणि आकर्षक टच मिळाला आहे.

Shivali Parab

भारी एम्ब्रॉयडरी बॉर्डर

साडीच्या पदरावर आणि खालच्या भागात चमकदार सिल्व्हर एम्ब्रॉयडरी दिसत आहे. त्यामुळे पारंपरिक लूकला ग्लॅमरस अंदाज मिळाला आहे.

Shivali Parab

कमरेवरील खास कंबरपट्टा

शिवालीने कमरेवर पारंपरिक पद्धतीचा आकर्षक कंबरपट्टा घातला आहे. यामुळे तिचा साडी लूक आणखी उठून दिसत आहे.

Shivali Parab

पारंपरिक दागिन्यांची साथ

गळ्यात नाजूक नेकलेस, कानात झुमके आणि हातात हिरव्या बांगड्या असा पारंपरिक दागिन्यांचा सुंदर मेळ तिने साधला आहे.

Shivali Parab

नाकातील नथ आणि बिंदीने लूक खुलला

नाकातील नथ आणि कपाळावरील छोटी बिंदी यामुळे शिवालीच्या लूकला खास मराठमोळा टच मिळाला आहे.

Shivali Parab

मेकअप आणि हेअरस्टाइल

मोकळे सोडलेले केस, उठावदार डोळ्यांचा मेकअप आणि न्यूड-टोन्ड लिपस्टिक असा साधा पण ग्लॅमरस मेकअप तिने केला आहे.

Shivali Parab

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

Cardamom Benefits | SaamTv
येथे क्लिक करा