Drishyam 3 OTT : थिएटरनंतर ओटीटीवर रंगणार 'दृश्यम ३'चा थरार, अजय देवगनचा चित्रपट कधी अन् कुठे पाहता येणार?

Ajay Devgn Drishyam 3 OTT Release : अजय देवगनचा 'दृश्यम ३' चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने ९ दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. चित्रपट ओटीटीवर कधी पाहता येणार जाणून घेऊयात.
Ajay Devgn Drishyam 3 OTT Release
Drishyam 3 OTT SAAM TV
Published On: 
Summary

'दृश्यम ३' चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज

'दृश्यम ३' अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 'ओपनिंग' करणारा चित्रपट

'दृश्यम ३' लवकरच येणार ओटीटीवर

'दृश्यम ३: द कन्क्लुजन' हा चित्रपट विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची कथा पुढे नेतो. अजय देवगनचा 'दृश्यम ३' चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा विजयच्या भूमिकेत झळकला आहे. या फ्रँचायझीमध्ये जयदीप अहलावत याचा समावेश झाल्यामुळे कथेला एक नवीन आणि महत्त्वपूर्ण पैलू मिळाला आहे. थिएटर गाजवल्यानंतर 'दृश्यम ३' आता ओटीटीवर येणार आहे, चित्रपटाचे ओटीटी अपडेट जाणून घ्या.

'दृश्यम ३' ओटीटी रिलीज

'फिल्मीबीट'च्या माहितीनुसार, अजय देवगनचा 'दृश्यम ३' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे. 'दृश्यम ३'चे ऑनलाइन राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहे. हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यात १३ ते २७ नोव्हेंबर दरम्यानचा कालावधी अपेक्षित आहे. मात्र, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. बॉलिवूड चित्रपटांच्या बाबतीत चित्रपटगृह आणि ओटीटी प्रदर्शनादरम्यान साधारणपणे ४५ ते ६० दिवसांचे अंतर असणे सामान्य आहे.

'दृश्यम ३' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ९

'दृश्यम ३: द कन्क्लुजन' ने दुसऱ्या शनिवारी बक्कळ कमाई केली आहे. या हिंदी क्राईम थ्रिलर चित्रपटाने भारतात २६.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली, ज्यामुळे त्याची देशांतर्गत एकूण निव्वळ कमाई २८६.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, नऊ दिवसांत चित्रपटाची जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन ४४६.८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाची देशांतर्गत एकूण कमाई ३४३.८० कोटी रुपये झाली आहे, तर परदेशातील एकूण कमाई १०३ कोटी रुपये इतकी आहे.

Ajay Devgn Drishyam 3 OTT Release
Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

'दृश्यम ३' स्टार कास्ट

'दृश्यम ३' अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 'ओपनिंग' करणारा ठरला आहे. 'दृश्यम ३'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. चित्रपटात अजय देवगण, जयदीप अहलावत, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, प्रकाश राज, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव कलाकार झळकले. 2015 ला 'दृश्यम' आणि 2022 ला 'दृश्यम 2' रिलीज झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com