Shreya Maskar
मार्च महिन्याचा शेवट 'हे काय नवीन?' ही रोमँटिक मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मराठी इंडस्ट्रीतील पावर कपल प्रिया बापट, उमेश कामत झळकणार आहे. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर ऑनलाइन स्ट्रीम होईल. ही सीरिज आज ३१ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुपरस्टार आमिर खानचा कमबॅक चित्रपट, 'सितारे जमीन पर', चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास नऊ महिन्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट ३ एप्रिल, २०२६ रोजी प्रदर्शित होईल.
अभिनेता संजय मिश्रा आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या 'वध' या क्राईम थ्रिलर चित्रपटाच्या यशानंतर, त्याचा सिक्वेल, 'वध २', फेब्रुवारीमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. आता, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट ३ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल.
'भाभीजी घर पर हैं' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा कॉमेडी चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल.
Maa Ka Sum या वेब सीरिजमध्ये आई-मुलाच्या नात्याची गोड आणि अनोखी कथा पाहायला मिळेल. ही सीरिज ३ एप्रिल रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल.
'ईट प्रे बार्क' हा चित्रपट १ एप्रिलपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
तैवानची फँटसी स्पाय थ्रिलर 'एजंट फ्रॉम अबव्ह ' वेब सीरिज २ एप्रिल २०२६ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन स्ट्रीम होईल.
ब्लडहाउंड्स – सीझन २ ३ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. यात दोन बॉक्सर मित्रांची गोष्ट सांगण्यात आली आहे. याचा पहिला सीझन देखील खूप गाजला.