Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

Bigg Boss 20 Wild Card Entry : 'बिग बॉस २०'च्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. सलमान खानने घरातील सदस्यांना चांगलाच धक्का दिला आहे.
Bigg Boss 20 Wild Card Entry
Bigg Boss 20 SAAM TV
Published On: 
Summary

बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री

प्रसिद्ध अभिनेता बिग बॉसच्या घरात

या आठवड्यात आसिफ खान घराचा कॅप्टन

सलमान खान करत असलेल्या 'बिग बॉस २०' सध्या चांगलाच गाजत आहे. शो मध्ये रोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. घरातील सदस्या तुफान राडा करत आहेत. दिवसेंदिवस स्पर्धा अधिकच मनोरंजक होत आहे. बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत तीन स्पर्धक एलिमिनेट झाले आहेत. या 'वीकेंड का वार'ला सलमान खानने स्पर्धकांना मोठा धक्का दिला आहे. 'बिग बॉस २०' च्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

'बिग बॉस २०' च्या घरात टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता मनीष गोयलने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे. आता घरात नवीन खेळ, नाती पाहायला मिळणार आहे. मनीषच्या एन्ट्रीमुळे घरातील सदस्य अस्वस्थ झाले आहेत. येणारे भाग जास्तच मनोरंजक ठरतील. या आठवड्यात १ नाही तर चक्क २ वाईल्ड कार्ड स्पर्धक घरात येणार आहे. त्यामुळे हा दुसरा स्पर्धक कोण, असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते आणि घरातील सदस्य उत्सुक आहेत.

'बिग बॉस २०'मध्ये या आठवड्याचे 'बॉस मीटर' विजेतेपद प्रेक्षकांच्या आवडत्या काझी तौकीरने पटकावले आहे. काझी पहिल्या दिवसापासून आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकत आहे. सलमान खान देखील 'वीकेंड का वार'मध्ये त्याचे कौतुक करताना दिसतो. शोमध्ये येणारा प्रत्येक सेलिब्रिटीने काझीचे कौतुक केले आहे. 'बिग बॉस २०' च्या घरात १६ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली होती. त्यातील रोहेद खान , ईशा रिखी, रिती तिवारी घराबाहेर पडले.

Bigg Boss 20 Wild Card Entry
Tharala Tar Mag : टक्कल, हातात काठी अन् डोक्यावर भांड्यांची टोपली; अर्जुन-सायलीला नेमकं झालं तरी काय? फोटोमुळे रंगली चर्चा

दुसरा वाईल्ड कार्ड स्पर्धक कोण?

'बिग बॉस २०'च्या घरात दुसरा कोणता कलाकार वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. यात अनेक नावे समोर आली आहेत. सोशल मीडियावरील चर्चेनुसार, इन्फ्लुएन्सर नकुल धुल, उर्फ ​​मिथ्टू डॉन, याचे नाव दुसरा वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com