Tharala Tar Mag : टक्कल, हातात काठी अन् डोक्यावर भांड्यांची टोपली; अर्जुन-सायलीला नेमकं झालं तरी काय? फोटोमुळे रंगली चर्चा

Arjun-Sayali New Look : 'ठरलं तर मग!' मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अर्जुन-सायलीला एका नव्या रुपात पाहून चाहते गोंधळले आहे. नेमकं मालिकेत घडणार काय, जाणून घ्या.
Arjun-Sayali New Look
Tharala Tar MagSAAM TV
Published On: 
Summary

'ठरलं तर मग!' मोठा ट्विस्ट

अर्जुन-सायलीचं बदललेले रुप पाहून चाहते थक्क

फोटो आणि व्हिडीओने सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या

ठरलं तर मग! मालिका दिवसेंदिवस अधिकच रंजक होत जात आहे. आता मालिकेच्या कथानकाने एक वेगळेच वळण घेतले आहे. चक्का अर्जुन आणि सायली एक नव्या रुपात पाहायला मिळत आहे. त्याच्या बदललेल्या लूकचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा पाहायला मिळत आहे. मालिकेत आता नेमकं काय घडणार, जाणून घेऊयात.

श्रीमंत अर्जुन सुभेदार एका गरीब म्हाताऱ्याच्या रुपात दिसत आहे. तर सायली गरोदर अवस्थेत डोक्यावर भांड्यांनी भरलेले टोपले घेऊन फिरताना दिसत आहे. सायली-अर्जुनचा हा अवतार पाहून चाहते गोंधळले आहेत. काहींना अर्जुन-सायलीला ओळखताही आले नाही, तर काहींनी दोघांना बरोबर ओळखले आहे.जुई गडकरी आणि अमित भानुशालीच्या या लक्षवेधी लूकची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

सायली-अर्जुन आता मंजुळा आणि शांतारामच्या वेशात दिसत आहेत. हा सर्व अर्जुन-सायलीचा सत्य शोधून काढण्यासाठीचा नवा प्लान आहे. डोहाळे जेवणापासून अर्जुन-सायलीच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकटे येताना दिसत आहे. प्रियाच्या कट कारस्थानामुळे सायलीला जेल होते. आश्रमातील मुलींची तस्करी केल्याप्रकरणी भर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमा दिवशी पोलीस सायलीला अटक करतात. अर्जुन केसचा तपास घेत असताना अर्जुनवर दोन वेळा जीवघेणा हल्ला होतो. मात्र अर्जुन त्यातून सुखरूप वाचतो.

Arjun-Sayali New Look
Famous Actress : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

आता प्रियाचे कट कारस्थान उघड करण्यासाठी आणि आश्रमातील मुलींच्या गायब होण्यामागे नेमकं कारण काय, शोधण्यासाठी सायली-अर्जुनने ही नवीन खेळी सुरू केली आहे. महिपतनेच मुलींना आश्रमात ठेवले असल्याचा संशय सायलीला असतो म्हणून सायली-अर्जुन आपला लूक बदलून आश्रमात शिरण्याचा प्लान करतात. आता दोघे नव्या रुपात महिपत-प्रियाचे सत्य कसं शोधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'ठरलं तर मग' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दररोज रात्री ८.३० वाजता पाहायला मिळते. 'ठरलं तर मग'च्या या प्रोमोवर चाहते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com