Tharala Tar Mag! : सायलीला लागले डोहाळे, अर्जुन लाडक्या बायकोसाठी बनवतो लाडू; प्रियामुळे दोघांच्या आनंदाला लागणार ग्रहण | VIDEO

Tharala Tar Mag Marathi Serial Update : 'ठरलं तर मग!' मालिकेत सायली-अर्जुन लवकरच आई-बाबा होणार आहेत. अशात अर्जुन सायलीचे डोहाळे पुरवताना दिसत आहे. मालिकेत नेमकं काय घडणार, जाणून घेऊयात.
Tharala Tar Mag Marathi Serial Update
Tharala Tar MagSAAM TV
Published On
Summary

सायली-अर्जुन लवकरच होणार आई-बाबा

अर्जुन सायलीचे डोहाळे पुरवतो

प्रिया जेलमध्ये राहून सायली विरोधात कट रचते

'ठरलं तर मग' मालिकेत रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एकीकडे सुभेदारांच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रिया नवीन डाव रचताना दिसत आहे. पावसात सायली-अर्जुन एका रोमँटिक डेटवर जातात. दोघे खूप छान वेळ घालवतात. अर्जुन सायलीसाठी बाहेरचा वडापाव देखील खातो. अशात आता 'ठरलं तर मग' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

'ठरलं तर मग!' मालिकेत लवकरच सायली-अर्जुन आई-बाबा होणार आहे. आता सायलीला डोहाळे लागले आहे. जे पुरताना अर्जुन दिसत आहे. सायलीचे डोहाळे पुरवताना अर्जुनची तारांबळ उडली आहे. याचा एक खास प्रोमो समोर आला आहे. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, अर्जुन सायलीसाठी लाडू बनवतो, जे सायलीला खूपच आवडतात. अर्जुनला लाडू व्यवस्थित वळता येत नव्हते तरी तो बायकोसाठी लाडू बनवतो. जे खाऊन सायलीला खूपच आनंद होतो.

त्यानंतर प्रतिमा आपल्या लाडक्या लेकीसाठी सायलीसाठी 'सायली' चा गजरा घेऊन येतो. जो पाहून तिला खूपच आनंद होतो. पण अर्जुनला मात्र सायलीच्या फुलांची अ‍ॅलर्जी असते. त्यामुळे फुलांचा वास घेताच तो शिंकू लागतो. तेव्हा लगेच सायलीला सुद्धा शिंका सुरू होतात. त्यानंतर प्रतिमा आणि कल्पना सायली-अर्जुनची फिरकी घेताना दिसतात. दोघेही हसू लागतात.

'ठरलं तर मग' चे येणारे भाग खूपच मजेशीर असणार आहेत. 'ठरलं तर मग!' मालिका रोज रात्री ८:३० वाजता प्रसारित होते. 'ठरलं तर मग' मालिकेत एक नवीन मुलीची एन्ट्री झाली आहे. जी प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये जाते. आता ही मुलगी सायली-अर्जुनच्या आयुष्यात नवीन कोणते वादळ घेऊन येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्या मुलीची भूमिका अभिनेत्री संचिता कुलकर्णी करत आहे.

Tharala Tar Mag Marathi Serial Update
Tharala Tar Mag : प्रियाचे नवे कट कारस्थान; अर्जुन-सायलीला करणार उद्ध्वस्त, जेलमध्ये राहून रचणार 'हा' मोठा खेळ | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com