Shreya Maskar
'राजा शिवाजी' बहुप्रतीक्षित चित्रपटाचे दिग्दर्शक रितेश देशमुख आणि निर्माती जिनिलिया देशमुख आहे. तसेच दोघे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात मराठी आणि हिंदी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळेल.
'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात जिनिलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
मराठी अभिनेत्री ईशा केसकरने २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'शेर शिवराज' चित्रपटात सईबाईंची भूमिका साकारली. हा चित्रपट दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आहे.
सायली संजीव हिने २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'हर हर महादेव' चित्रपटात महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकली.
मराठी अभिनेत्री पूर्वा गोखलेने 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सईबाईंची भूमिका साकारली. ही मालिका छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित होती.
मराठमोळी अभिनेत्री रुजुता देशमुखने लोकप्रिय टीव्ही मालिका 'राजा शिवछत्रपती'मध्ये सईबाईंची भूमिका साकारली. ही मालिका ओटीटीवर आजही प्रेक्षक आवडीने पाहतात.
'राजा शिवाजी' चित्रपटात महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.