Shreya Maskar
१ मे ला रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट रिलीज होणार आहे. यात रितेश देशमुख शिवरायांची भूमिका साकारणार, तर चित्रपटात जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.
'राजा शिवछत्रपती' या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. अमोल कोल्हे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला.
मराठी ज्येष्ठ अभिनेता महेश मांजरेकर यांनी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. महेश मांजरेकरांच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक झाले.
चिन्मय मांडलेकर यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'शिवराज अष्टक' या 8-चित्रपटांच्या मालिकेत राजांची भूमिका साकारली. यात फर्जंद, सुभेदार , पावनखिंड अशा चित्रपटांचा समावेश आहे.
शरद केळकरने 'तान्हाजी' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याने सुभेदार तान्हाजी यांची भूमिका साकारली.
अभिनेता भूषण प्रधानने 2021 मध्ये स्टार प्रवाहवर प्रसारित झालेल्या 'जय भवानी जय शिवाजी' या मराठी ऐतिहासिक टीव्ही मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.
सुबोध भावेने 2022 मधील 'हर हर महादेव' या मराठी ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या मराठी चित्रपटात सिद्धार्थ बोडकेने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे.