Shreya Maskar
सबसे कातिल गौतमी पाटील पुन्हा एकदा आपल्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील लावणी क्वीन आहे. तिच्या नृत्याचे महाराष्ट्रात लाखो चाहते दिवाने आहेत.
गौतमी पाटीलने नुकतेच गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ घाले आहेत. फोटोंमध्ये गौतमी पाटील वेस्टन लूकमध्ये दिसत आहे.
एका लूकमध्ये गौतमी केशरी रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेल्या एका सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. सुंदर हेअर स्टाइल आणि गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
दुसऱ्या लूकमध्ये तिने निळ्या रंगाचा सुंदर वेस्टर्न ड्रेस स्टाइल केला आहे. गोल्डन ज्वेलरी आणि बांधलेले केस यांमध्ये गौतमी खूपच कमाल दिसत आहे. तिने मिनिमल मेकअप केला आहे, ज्यामुळे तिचे सौंदर्य खुलले.
आज गौतमी पाटीलचे नवीन गाणे ‘तू मोरनी’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. काही वेळातच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात गौतमी पाटील हटके अंदाजात दिसत आहे.
उन्हाळ्यात मस्त समुद्रकिनारी गौतमीने फोटोशूट केले आहे. डोक्यावर पिकनिक हॅट घालून गौतमी एन्जॉय करताना दिसत आहे. गौतमीची कातिल नजर, चेहऱ्यावरचे हास्य आणि साधा-भोळा स्वभाव प्रेक्षकांना आपलं करतो.
गौतमी पाटीलच्या फोटोवरल चाहते भरभरून कमेंट्स करत आहे. एका युजरने लिहिलं की, “बॉलीवूडवाल्यांनी जरा जपून...” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, “तुम्ही खूप गोड दिसताय...अप्रतिम सुंदर अगदी नजर लागण्यासारखं रियल मराठी लूक...” गौतमीला पाहून नेहमीप्रमाणे चाहत्यांची विकेट पडली आहे.
गौतमी पाटील आजवर अनेक गाण्यांमध्ये झळकली आहे. अलिकडेच गौतमी पाटीलची 'सुंदरा', 'बैलगाड्याचा नाद', 'रुपेरी वाळूत' अशी अनेक गाणी रिलीज झाली.