Shreya Maskar
नृत्यांगणा गौतमी पाटीलचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती नवरीच्या रुपात दिसत आहे. त्यामुळे गौतमीचे लग्न झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतमी पिवळ्या रंगाच्या सुंदर साडीत दिसत आहे. तिच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधल्या आहेत. नाकात नथ दिसत आहे.
मराठमोळा साज श्रृंगार करून गौतमी नटली आहे. तिच्यासोबत तिचा जोडीदारही उभा आहे. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता आहे. गौतमीच्या शेजारी नवरदेवाच्या रुपात शिव ठाकरे उभा आहे.
गौतमी आणि शिवच्या या फोटोंमुळे दोघांनी लग्न केल्याचे बोले जात आहे. मात्र असे काही नसून गौतमी आणि शिव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी एक नवीन गाणे घेऊन आले आहेत.
गौतमी आणि शिवचे लग्नाचे फोटो हे त्यांच्या नवीन गाण्याचा एक भाग आहे. हे शूटिंगचे फोटो आहेत. 'मासोळी सोन्यावाणी' असे त्यांच्या गाण्याचे नाव आहे.
फोटोंमध्ये गौतमी आणि शिवचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोघांनी छान समुद्रकिनारी ही शूट केले आहे.
शिव ठाकरे हा 'रिॲलिटी शो किंग' आहे. नुकताच त्यांनी The 50 हा शो जिंकला आहे. तसेच शिव ठाकरे हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. तसेच त्याने 'बिग बॉस हिंदी 16'मध्ये उपविजेता पद पटकावले.
गौतमी पाटील अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. 'शिट्टी वाजली रे', 'देवमाणूस' या मालिकांमध्ये ती दिसली.अलिकडेच गौतमी पाटीलची 'सुंदरा', 'बैलगाड्याचा नाद', 'रुपेरी वाळूत' अशी अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.