Shreya Maskar
अभिनेत्री श्वेता तिवारी हे टिव्ही इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. आजवर तिने हिंदी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या लूकचे फोटो, कामासंबंधित अपडेट आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी यांचे कायम अपडेट ती देत राहते. तिचे इन्स्टाग्राम 5.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.
नुकतेच श्वेता तिवारीने सुंदर लाल रंगाची साडी नेसली आहे. साडीला मॅचिंग गोल्डन ज्वेलरी तिने परिधान केली आहेत. ज्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअपमध्ये श्वेता तिवारीचे सौंदर्य खुलून आले आहे. जणू स्वर्गातील परी वाटत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य आहे.
गळ्यात हार, कानात मोठे पारंपरिक, कपाळावर टिकली, हातात कडा टाइल बांगडी अशी सुंदर ज्वेलरी तिने परिधान केली आहे.
"खूप सुंदर श्वेता तिवारी", "आपकी खूबसूरती कभी कम नहीं होती...", "माझं तुझ्यावर प्रेम आहे, स्वीटू...", "सुंदर साडीत तुझे हास्य आणि चेहरा अत्यंत मोहक दिसतो...", "रूप तेरा मस्ताना "
श्वेता तिवारी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. वयाच्या ४५ व्या वर्षीही तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.
श्वेता तिवारी 'कसौटी ज़िंदगी की' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. श्वेता तिवारी हिंदी 'बिग बॉस 4' ची विजेता देखील झाली आहे.