Shreya Maskar
'बिग बॉस मराठी 2' चा विजेता शिव ठाकरे टिव्ही इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. त्याने आजवर अनेक रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. तरुणाई शिव ठाकरेची दिवानी आहे.
अशात शिवने आता चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. मराठमोळा अभिनेता शिव ठाकरेने नुकतेच व्यवसायात पदार्पण केले आहे. त्याने स्वतःचे सलून सुरू केले आहे.
शिव ठाकरेच्या नवीन सलूनचे नाव amraa studio salons असे आहे. त्यांनी हे सलून मुंबई-पुणे नव्हे तर अमरावतीमध्ये उघडले आहे.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिव ठाकरेने नव्या-कोऱ्या सलूनचे उदघाटन केले. आपल्या लाडक्या आजीच्या हाताने त्याने सलूनचे उदघाटन केले.
काही दिवसांपूर्वी शिवने आजीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो आपले नवीन सलून आजीला दाखवताना दिसत आहे. नातवाची प्रगती पाहून आजीला देखील खूप आनंद झाला आहे.
व्हिडीओमध्ये सलून तयार होताना दिसत आहे. त्याचे इंटेरिअर डिझायन सुरू होते. शिव ठाकरेचे नवीन सलून खूपच मोठे आहे.
शिव ठाकरे शेअर केलेल्या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी त्याचे कौतुक करताना, त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.
अलिकडेच शिव ठाकरे THE50 मध्ये दिसला होता. त्याने रोडीज, बिग बॉस मराठी, बिग बॉस हिंदी, खतरों के खिलाडी, झलक दिखला जा या शोमध्ये भाग घेतला होता.