Shreya Maskar
आज (19 मार्च 2026) गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असतो. या दिवशी घराबाहेर गुढी उभारून सुख-समृद्धीचे स्वागत केले जाते.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रसिद्ध मराठमोळ्या जोडीने आपल्या नवीन घरात प्रवेश केला आहे. ज्याची सुंदर झलक त्यांनी सोशल मिडिया व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे.
'झिम्मा', ' क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' अशा लोकप्रिय चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर होय. सिद्धार्थ चांदेकर यांने नवीन घर खरेदी केले आहे.
सिद्धार्थने बायको मिताली मयेकरसोबत नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. सिद्धार्थ आणि मितालीने 2021 मध्ये लग्नगाठ बांधली.
नवीन घरात दोघांनी सुखाची गुढी उभारली आहे. व्हिडीओत दोघे गुढीची पूजा करताना दिसत आहे. दोघेही पारंपरिक कपड्यात पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ आणि मिताली खूपच खुश आहे.
दोघांनी खास मराठमोळा लूक केला आहे. मितालीने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. केसात गजरा, हातात हिरवा चुडा आणि मराठमोळा साज श्रृंगार करून अभिनेत्री नटली आहे. तर सिद्धार्थने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
सिद्धार्थ चांदेकर अलिकडेच माधुरी दीक्षितसोबत 'मिसेस देशपांडे ' सीरिजमध्ये झळकला. तसेच त्याचा अलिकडेच रिलीज झालेला 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट खूप गाजला.
मिताली मयेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेक मालिका, चित्रपटांमध्ये दिसते. 'फ्रेशर्स' या मालिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. तसेच ती अलिकडे 'फसक्लास दाभाडे' चित्रपटात झळकली.