Shreya Maskar
मराठमोळ्या मृणाल ठाकूरने आजवर साऊथ, हिंदी, मराठी मनोरंजन सृष्टी आपल्या अभिनयाने गाजवली आहे. तसेच तिने हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
मृणाल ठाकूरचा नुकताच 'दो दीवाने एक शहर' चित्रपट रिलीज झाला आहे. यात ती बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत झळकली आहे. मृणालचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.
अभिनेत्री मृणाल ठाकूरने पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिराला भेट दिली आहे. तिने गणपतीचे आशीर्वाद घेतले आहेत. याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोमध्ये मृणाल ठाकूर सुंदर पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत आहे. तिने मंदिरात फोटो काढले आहेत. तिने सुंदर लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. चेहऱ्यावर एक स्मित हास्य पाहायला मिळत आहे.
मृणाल ठाकूरने फोटोला एक खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "पुण्यात आलो आणि बाप्पाचं दर्शन घेतलं नाही तर काय केलं? #दगडूशेठ "
मृणाल ठाकूरच्या फोटोंवर चाहते, कलाकार मंडळी कमेंट्स करताना दिसत आहे. फोंटोमध्ये मृणाल खूपच सुंदर आणि प्रसन्न दिसत आहे.
2018 साली रिलीज झालेल्या लव्ह सोनिया (Love Sonia) चित्रपटातून मृणालने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर 2022 साली रिलीज झालेल्या सीता रामम (Sita Ramam) चित्रपटातून साऊथमध्ये एन्ट्री घेतली.
मृणाल ठाकूरने 2014 मध्ये 'हॅलो नंदन' (Hello Nandan) या मराठी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर ती त्याच वर्षी 'विट्टी दांडू' (Vitti Dandu) या चित्रपटातही दिसली.