Tharala Tar Mag: 'सायली नाही... आता तन्वी म्हणायचं'; 'ठरलं तर मग'मध्ये अखेर रंगणार ग्रँड सेलिब्रेशन

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर आलं आहे. यानिमित्ताने 8 जुलै रोजी 'स्टार प्रवाह'वर विशेष सेलिब्रेशनचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tharala Tar Mag
Tharala Tar MagSaam Tv
Published On

Tharala Tar Mag: 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न अखेर सुटला असून सुभेदार कुटुंबाची लाडकी सून सायली हीच खरी तन्वी किल्लेदार असल्याचे सत्य सर्वांसमोर आले आहे. या खुलाशानंतर मालिकेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता प्रेक्षकांसाठी एका खास सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली आहे.

मालिकेच्या अलीकडील भागात सायलीला तिचा संपूर्ण भूतकाळ आठवतो. त्याचवेळी मधुभाऊही शुद्धीवर आल्याने अनेक गुपितांवरचा पडदा दूर होतो आणि सायलीची खरी ओळख सर्वांसमोर येते. या महत्त्वाच्या क्षणानंतर सायलीसाठी एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा प्रेक्षकांना 8 जुलै रोजी पाहायला मिळणार आहे.

या सेलिब्रेशनमध्ये 'स्टार प्रवाह'वरील विविध लोकप्रिय मालिकांतील नायिका पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सखी, नंदिनी, आनंदी, ईश्वरी, जानकी, नुपूर, कृष्णा आणि काव्या या सर्वजणी सायलीला खास सरप्राइज देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या या आगमनामुळे विशेष भाग अधिक रंगतदार होणार आहे.

प्रोमोमध्ये या नायिका म्हणताना दिसतात, "तारीख ठरलीये... वेळही फिक्स आहे. कारण अखेर आमच्या सायलीला तिची खरी ओळख मिळाली आहे. एवढ्या मोठ्या आनंदासाठी सरप्राइजही तितकंच मोठं असायला हवं. आता सायली नाही... तन्वी म्हणायचं!" या विशेष भागामागे आणखी एक खास योगायोगही आहे. मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिचा वाढदिवस 8 जुलै रोजी असतो. विशेष म्हणजे मालिकेतील हा सेलिब्रेशन एपिसोडही त्याच दिवशी प्रसारित होणार असल्याने हा दिवस जुई आणि तिच्या चाहत्यांसाठी दुहेरी आनंदाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com