Fact Check: सचिन तेंडुलकरची लेक लवकरच होणार देओल कुटुंबाची सून? सनी देओलच्या मुलासोबत जोडलं नाव

Sara Tendulkar And Rajveer Deol Wedding Rumours: सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि सनी देओलचा मुलगा राजवीर देओल यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. २०२७ मध्ये दोघे लग्न करणार असल्याचा दावा किती खरा? जाणून घ्या या व्हायरल बातमीमागचं सत्य.
SARA TENDULKAR TO MARRY RAJVEER DEOL
SARA TENDULKAR TO MARRY RAJVEER DEOLsaam tv
Published On: 

सोशल मीडियावर सध्या एका चर्चेने जोर धरला आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, सारा तेंडुलकर ही बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांचा मुलगा राजवीर देओल याच्यासोबत लग्न करणार असल्याचा दावा सोशल मीडियावरील काही पोस्टमधून केला जात आहे. दोघांचा विवाह २०२७ मध्ये होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नासंदर्भात चर्चा सुरू असल्याचा आणि राजवीरकडून साराला महागड्या भेटवस्तू पाठवल्या जात असल्याचाही दावा केला जात आहे. मात्र, या चर्चांना अद्याप सारा तेंडुलकर किंवा राजवीर देओल यांच्याकडून कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे सध्या या बातम्या केवळ सोशल मीडियावरील चर्चांपुरत्याच मर्यादित आहेत.

SARA TENDULKAR TO MARRY RAJVEER DEOL
Actor Death: मनोरंजनसृष्टीतील आणखी एक तारा हरपला! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; परदेशात अखेरचा श्वास, सिनेविश्वात हळहळ

सारा तेंडुलकर आणि राजवीर देओलच्या लग्नाची चर्चा कशी सुरू झाली?

सारा तेंडुलकर आणि राजवीर देओल यांच्या कथित नात्याची चर्चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील एका पोस्टनंतर सुरू झाली. @Bhumika_2026 या अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राजवीर देओल साराला महागड्या भेटवस्तू पाठवत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच दोघे २०२७ मध्ये लग्न करू शकतात, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली. यानंतर रेडिटवरही या कथित नात्याबाबत चर्चा सुरू झाली. या चर्चांमध्ये साराची वहिनी सानिया चांडोक हिच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला. तिने पुढील वर्षी लग्न होण्याचे संकेत दिल्याचा दावा काही पोस्टमधून करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांनाही कोणताही अधिकृत आधार नाही.

SARA TENDULKAR TO MARRY RAJVEER DEOL
Diljit Dosanjh: मा‍झ्याच गाण्यांवर बंदी का? ४ गाणी बॅन केल्यामुळे दिलजीत दोसांझचा संताप अनावर

कोण आहे राजवीर देओल?

राजवीर देओल हा बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांचा धाकटा मुलगा आहे. राजवीरने २०२३ मध्ये 'दोनों' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पूनम ढिल्लों यांची मुलगी पलोमा झळकली होती. दुसरीकडे, सारा तेंडुलकर ही क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी आहे. सोशल मीडियावर साराचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या फोटोंची आणि वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा होत असते.

SARA TENDULKAR TO MARRY RAJVEER DEOL
Marathi Actress : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीन घाई! लाडक्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा, PHOTO शेअर करत दिली गुडन्यूज

खरंच २०२७ मध्ये सारा तेंडुलकर बोहल्यावर चढणार?

सध्या सारा तेंडुलकर आणि राजवीर देओल यांच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चांना कोणताही अधिकृत आधार नाही. दोघांनीही आपल्या नात्याबाबत किंवा लग्नाच्या नियोजनाबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे २०२७ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांवर विश्वास ठेवणे घाईचे ठरेल. आता या चर्चांवर सारा आणि राजवीर यांच्यापैकी कोण प्रतिक्रिया देणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.