Marathi Actress : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीन घाई! लाडक्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा, PHOTO शेअर करत दिली गुडन्यूज

Marathi Actress Daughter Engagement : मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लेकीचा साखरपुडा सोहळा पार पडला आहे. अभिनेत्रीने या खास क्षणाचे फोटो शेअर केले आहेत.
Marathi Actress Daughter Engagement
Marathi ActressSAAM TV
Published On: 

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ, लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आपल्या अभिनयाने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आता मुलीच्या आयुष्यातील एका खास क्षणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या धाकट्या मुलीचा, डॉ. कस्तुरी आठल्येचा नुकताच संकेत दुधाळ यांच्यासोबत थाटामाटात साखरपुडा पार पडला. या खास सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

अलका कुबल यांनी स्वतः सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे सुंदर फोटो शेअर करत मुलगी कस्तुरी आणि होणारे जावई संकेत यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांसह मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कस्तुरी आणि संकेत यांचा एकत्रित फोटो शेअर करत त्यांनी दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिलं की, "तुमच्या दोघांनाही आयुष्यभर प्रेम, हास्य आणि एकमेकांची साथ लाभो, हीच शुभेच्छा. तुमच्या साखरपुड्यानिमित्त तुमचे अभिनंदन!"

कस्तुरीचा सुंदर लूक

या खास प्रसंगी कस्तुरीने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. पारंपरिक दागिने, गळ्यातील हार, कमरपट्टा आणि नथ अशा दागिन्यांनी तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. पारंपरिक वेशभूषेत कस्तुरी अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Marathi Actress Daughter Engagement
Ramayana Collection : तिसऱ्या आठवड्यात 'रामायण'ची कमाई जोरात; भारतातच ९०० कोटींचा टप्पा पार, वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

कस्तुरी आठल्ये कोण?

मीडिया रिपोर्टनुसार, अलका कुबल आणि समीर आठल्ये यांच्या दोन्ही मुली मनोरंजनविश्वापासून दूर आहेत. त्यांची मोठी मुलगी ईशानी ही वैमानिक आहे. तर धाकटी मुलगी कस्तुरी हिने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत आहे. तिने फिलिपिन्समध्ये MBBS चं शिक्षण पूर्ण केलं आहे. अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानी हिचा विवाहसोहळा २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला होता. आता धाकटी मुलगी कस्तुरीचा संकेत दुधाळ यांच्यासोबत साखरपुडा झाल्याने आठल्ये कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.