Devmanus: 'देवमाणूस'मालिकेत अलका कुबल यांची दमदार एन्ट्री; 'माहेरची साडी'चा नॉस्टॅल्जिक ट्विस्ट

Devmanus Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय थ्रिलर मालिका 'देवमाणूस – मधला अध्याय'मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची एन्ट्री झाली आहे.
Devmanus Marathi Serial
Devmanus Marathi SerialSaam Tv
Published On

Devmanus Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय थ्रिलर मालिका 'देवमाणूस – मधला अध्याय'मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची एन्ट्री झाली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये त्यांचा प्रवेश दाखवण्यात आला असून, त्यांच्या पात्रामुळे मालिकेत एक नवा आणि नॉस्टॅल्जिक ट्विस्ट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत .

प्रोमोमध्ये, गोपाळ टेलर कपडे शिवत असताना अलका कुबल त्याच्याकडे येतात आणि विचारतात, "ते वर्ल्ड फेमस गोपाळराव टेलर तुम्हीच का?" त्यांच्या येण्यामुळे गोपाळही चकित होतो. या दृश्यामुळे 'माहेरची साडी' या अलका कुबल यांच्या गाजलेल्या चित्रपटाची आठवण प्रेक्षकांना होणार आहे, ज्यामुळे मालिकेत एक भावनिक आणि नॉस्टॅल्जिक वळण येणार आहे.

Devmanus Marathi Serial
Makeup Steps: ऑफिस किंवा पार्टीमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी 'या' मेकअप स्टेप करा फॉलो

'देवमाणूस – मधला अध्याय' ही मालिका आधीपासूनच रहस्य आणि नाट्यपूर्ण कथानकासाठी ओळखली जाते. किरण गायकवाडने साकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अलका कुबल यांच्या सामील होण्यामुळे कथानकात नवीन वळण येणार आहे .

Devmanus Marathi Serial
Tiger Man Passes Away: भारताचे 'टायगर मॅन' वाल्मीक थापर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

अलका कुबल या मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी 'माहेरची साडी', 'लेख चालली सासरला' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या 'देवमाणूस' मालिकेतील प्रवेशामुळे मालिकेच्या कथानकात एक नवीन आणि रोमांचक वळण येणार आहे. 'देवमाणूस' ही मालिका लवकरत येत्या २ जून पासून रात्री १० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com