Actor Death: मनोरंजनसृष्टीतील आणखी एक तारा हरपला! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; परदेशात अखेरचा श्वास, सिनेविश्वात हळहळ

Actor Death: मल्याळम अभिनेता रॉबिन वर्गीस यांचे अमेरिकेत वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले. मम्मुट्टी यांच्या जॉनी वॉकर चित्रपटातील शेलीच्या भूमिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली होती.
Malayalam actor Robin Varghese passed away
Malayalam actor Robin Varghese passed away Saam Tv
Published On: 

Actor Death: मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रॉबिन वर्गीस यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. मल्याळम सुपरस्टार मम्मुट्टी यांच्या १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जॉनी वॉकर' या चित्रपटातील शेली या भूमिकेमुळे रॉबिन यांना विशेष ओळख मिळाली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने मल्याळम चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

मिळालेल्या माहितीनुसार, रॉबिन वर्गीस यांचे १९ नोव्हेंबर २०२६ रोजी अमेरिकेत निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. ते मूळचे केरळमधील तिरुवल्ला येथील कुन्नमथानम, मल्लापल्ली गावचे रहिवासी होते. त्यांनी कोचीन कोरस या मिमिक्री ग्रुपमधून मनोरंजनविश्वात प्रवेश केला होता. त्यानंतर अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहते आणि चित्रपटप्रेमी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Malayalam actor Robin Varghese passed away
Kaaliya Movie: कार्तिक आर्यनचा वाढदिवशी चाहत्यांना मोठ सरप्राईज! 'कालिया'चा थरारक टीझर रिलीज, श्रीकृष्ण कथेतून उलगडणार रहस्य

'जॉनी वॉकर'मधील शेलीच्या भूमिकेमुळे मिळाली ओळख

रॉबिन वर्गीस यांना खरी लोकप्रियता १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जॉनी वॉकर' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात मम्मुट्टी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन जयाराज यांनी केले होते. यामध्ये रॉबिन यांनी शेली नावाची भूमिका साकारली होती. ते मम्मुट्टी यांच्या पात्राच्या भावाचे मित्र दाखवण्यात आले होते. चार मित्रांच्या ग्रुपमधील शेली या पात्रामुळे रॉबिन प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आजही मल्याळम चित्रपटप्रेमी त्यांना 'जॉनी वॉकर'मधील शेली या भूमिकेसाठी ओळखतात.

Malayalam actor Robin Varghese passed away
Diljit Dosanjh: मा‍झ्याच गाण्यांवर बंदी का? ४ गाणी बॅन केल्यामुळे दिलजीत दोसांझचा संताप अनावर

'सोलोमन्स मॅनवत्ती सोफिया'मध्येही केले होते काम

'जॉनी वॉकर'नंतर रॉबिन यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत अभिनय सुरू ठेवला. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सोलोमन्स मॅनवत्ती सोफिया' या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. याशिवाय काही कन्नड चित्रपट आणि शॉर्ट फिल्म्समध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मल्याळम चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहते त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.