देवीचं दर्शन घेऊन परतताना भाविकांचा भीषण अपघात; १५ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रकच्या धडकेने उलटला, परिसरात हळहळ

Tragic Accident in Saharanpur: उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या देवबंद येथे शाकंभरी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जखमी झाले आहेत.
SAHARANPUR ACCIDENT
SAHARANPUR ACCIDENTsaam tv
Published On: 

उत्तर प्रदेशचे सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे भीषण अपघात झाला. शाकंभरी देवीचे दर्शन घेऊन मातेची ज्योत घेऊन पदयात्रेने परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास महामार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. या दुर्घटनेत चार भविकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

SAHARANPUR ACCIDENT
अभिजीत दिपकेंचा अटकेनंतर नवा व्हिडिओ समोर; CJP आंदोलनाबाबत केली मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

मृत भाविक हे मेरठ जिल्ह्यातील सरधना परिसरातील कुशावली गावचे रहिवासी होते. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमीना रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या महितीनुसार, कुशावली गावातील 19 लोक 7 ऑक्टोबरला ट्रॅक्टर ट्रॉलीने शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर शनिवारी सकाळी सर्वजण मातेची ज्योत घेऊन पदयात्रेने गावाकडे परतत होते. याच दरम्यान देवबंद येथील महामार्गावरील उड्डाणपुलावर पाठीमागून आलेल्या भांडी भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या ट्रॅक्टरला धडक दिली.

SAHARANPUR ACCIDENT
Nitin Navin : ".....तर कारवाई होणार" भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा CJP आणि राहुल गांधी यांना इशारा

या भीषण अपघातात रमेश (वय 40), सागर (वय 34), अमन (वय 23) आणि सतेंद्र यांचा मृत्यू झाला. अपघातात 15 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्वतःच्या वाहनांसह दुचाकी आणि रुग्णवाहिकांच्या जखमीना सरकारी रुग्णालयात पोहोचवले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमीना पुढील उपचारांसाठी सहारनपूर आणि मेरठ येथील रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

SAHARANPUR ACCIDENT
CJP च्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड; पदाधिकाऱ्यांना पहाटे घेतले ताब्यात

या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com