अभिजीत दिपकेंचा अटकेनंतर नवा व्हिडिओ समोर; CJP आंदोलनाबाबत केली मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

Abhijit Dipke latest video : दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजित दिपके यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्यांनी अजिंक्य शिंदे यांच्याकडे CJP आंदोलनाची जबाबदारी सोपवण्याबाबत सांगितले आहे.
Abhijit Dipke, Ajinkya Shinde, CJP Protest,
Abhijit Dipke, Ajinkya Shinde, CJP Protest,
Published On: 

Abhijit Dipke, Ajinkya Shinde, CJP Protest : दिल्लीत जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना अटक केली. दिल्लीतील विमानतळावरच या तिघांना ताब्यात घेतलं होतं. आता दिपकेंनी अटक केल्याची माहिती व्हिडीओद्वारे केली आहे. या कारवाईनंतर अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दिपकेंनी आपल्या अनुपस्थितीत आंदोलनाची धुरा कोण सांभाळणार, याबाबत माहिती दिली आहे.

व्हिडिओमध्ये काय म्हणाले अभिजीत दिपके?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके म्हणत आहेत की, "हॅलो एव्हरीवन. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर याचा अर्थ मी, आशु आणि सौरभ आम्ही तिघेही अटक झालो आहोत. आमच्यानंतर या मुव्हमेंटला अजिंक्य लीड करेल. तर तुम्ही जेवढेही हे व्हिडिओ पाहत आहात, कृपया अजिंक्य शिंदेंना फॉलो करा. आशुतोष, मी आणि सौरभनंतर ते 'कॉकरोच जनता पार्टी' पुढे चालवतील. धन्यवाद."

Abhijit Dipke, Ajinkya Shinde, CJP Protest,
अभिजित दीपकेंच्या आजींचं निधन, नातू दिल्लीत आंदोलनात असतानाच घेतला अखेरचा श्वास

पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीचं दिपकेंकडून प्लॅन B तयार केला होता, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिपकेंनी आधीच हा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याचे दिसतेय. यामुळे आता CJP च्या आंदोलनाची पुढील धुरा अजिंक्य शिंदे यांच्या हाती असणार आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Abhijit Dipke, Ajinkya Shinde, CJP Protest,
आधी हात जोडले अन् नंतर पोलिसांशी हुज्जत... दिपकेंसोबत विमानात काय घडलं? २.२१ मिनिटांचा थरारक व्हिडीओ

कोणत आहेत अजिंक्य शिंदे?

३५ वर्षांचे अजिंक्य शिंदे ह मूळचे महाराष्ट्रातील अलिबागचे आहेत. शिंदे हे सीजीपीच्या राष्ट्रीय संघटना प्रभारी म्हणून काम पाहात आहेत. अंजिक्य शिंदे हे अनेक वर्षांपासून अभिजीत दीपके यांच्या जवळचे आहेत. दीपके आणि अंजिक्य यांची पहिली भेट २०१६ मध्ये गोव्यात झाली.

अजिंक्य शिंदे यांनी यापूर्वी महाराष्ट्र आणि गोव्यात'आम आदमी पार्टी' (AAP) च्या युवा आघाडीचे संयोजक व सह-प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे राष्ट्रीय संघटन प्रभारी म्हणून कार्यरत आहेत.

अभिजित दिपके आणि आशुतोष रांका हे स्वतः अजिंक्य शिंदे यांना आपले मार्गदर्शक (मेंटर) मानतात. CJP च्या आंदोलनांची रणनीती आखणे, देशभरात स्वयंसेवकांची मजबूत टीम तयार करणे आणि पक्षाचा विस्तार करण्याचे काम प्रामुख्याने तेच पाहतात. दिल्लीत अभिजित दिपके आणि इतर सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता CJP च्या आंदोलनाची आणि पुढील संपूर्ण धुरा अजिंक्य शिंदेंच्या हातात सोपवण्यात आली आहे. ते सहसा प्रसिद्धीझोतापासून दूर राहून पडद्यामागे रणनीती आखण्याचे काम करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com