Abhijit Dipke grandmother Savitribai Shankar Dipke dies at 85 : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संतुक पिंपरी परिसरासह राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
नातवाला आजीने पाठिंबा देखील दिला होता मात्र आता पुन्हा एकदा अभिजीत दीपके आंदोलन करत असताना त्यांच्या आजी जगाचा निरोप घेऊन गेल्या आहेत. जंतर-मंतरवरील आंदोलनासाठी दिल्लीत गेलेल्या अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकीकडे दिल्लीत आंदोलनावरून राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींचा हायव्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच, दुसरीकडे मूळ गावी आजीचे छत्र हरपल्याने दिपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सध्या अभिजित दिपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने, या कठीण प्रसंगी ते आपल्या मूळ गावी हिंगोलीला कधी आणि कसे पोहोचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.