आधी हात जोडले अन् नंतर पोलिसांशी हुज्जत... दिपकेंसोबत विमानात काय घडलं? २.२१ मिनिटांचा थरारक व्हिडीओ

Abhijit Dipke Viral Video : दिल्लीतील जंतरमंतरवरील CJP आंदोलनापूर्वी संस्थापक अभिजित दिपके आणि सहकारी सौरभ दास व आशुतोष रांका यांना IGI विमानतळावर विमानातूनच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
Abhijit Dipke 2 minute 21 second viral video
Abhijit Dipke 2 minute 21 second viral videoSaam
Published On: 

Abhijit Dipke 2 minute 21 second viral video : दिल्लीतील जंतर-मंतरवर आज होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टच्या (CJP) आंदोलनाआधीच दिल्ली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. सकाळी ध्रुव राठी याला घरातून ताब्यात घेतले. तर मुंबईहून दिल्लीला पोहोचलेले CJP संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सह-संस्थापक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली(IGI) विमानतळावर विमानातूनच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विमानात पोलीस शिरल्यानंतर दिपके यांनी पोलिसांसोबत बोलत असतानाचं थेट इंस्टाग्राम लाईव्ह केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी दिल्लीत आज १० ऑक्टोबर रोजी सीजीपीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. पण पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असून संपूर्ण दिल्लीत कलम १६३ लागू केले. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी आज सकाळपासूनच मोठी धरपकड सुरू केली आहे. दीपके, राठी, रांका, दास यांच्यासह अनेकांना ताब्यात घेण्यात आले. पण सीजीपीचे आंदोलन थांबणार नाही, ते सुरूच राहील, अशी माहिती सीजीपीने सोशल मीडियावरून दिली.

Abhijit Dipke 2 minute 21 second viral video
दिल्लीत पाय ठेवण्याआधीच अभिजित दिपकेंना विमानातूनच उचलले, पोलिसांची मोठी कारवाई; व्हिडीओ समोर

अभिजित दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचं विमान धावपट्टीवर उतरताच पोलिसांनी त्यांना विमानाच्या आतच रोखले. यावेळी अभिजित दिपके यांनी आधी पोलिसांना हात जोडले आणि नंतर "आम्हाला कोणत्या आधारावर रोखले जात आहे?" असा सवाल करत तीव्र विरोध दर्शवला. या संपूर्ण घटनेचे दिपके यांनी सोशल मीडियावर लाईव्ह केले होते. त्यामध्ये ते आणि त्यांचे सहकारी 'भारत माता की जय'च्या घोषणा देताना दिसत आहेत. आम्ही अटक होण्यासाठीच आलो आहोत. आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. आमचा आवाज ताबला जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिपकेंनी दिली. धक्कादायक म्हणजे विमानातून दीपकेंना ताब्यात घेण्यासाठी सर्व महिला पोलीस आल्या होत्या.

"मी इथे अटक करून घेण्यासाठीच आलोय, मला अटक करा!" असे म्हणत अभिजीत दिपकेंनी थेट दिल्ली पोलिसांना आव्हान दिले. यावर, "नाही, ही अटक नाहीये, कृपया सहकार्य करा," असे म्हणत दिल्ली पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला.

सध्या दिल्ली पोलिसांनी या कारवाईला 'अटक' (Arrest) न मानता केवळ 'तात्पुरतं ताब्यात घेतलं' (Detention) म्हटले आहे. पोलिसांनी तिघांनाही विमानातून खाली उतरवून एका बसमध्ये बसवले आणि तिथून सुरक्षितपणे हलवले.

दरम्यान, विमान आयजीआय (IGI) विमानतळावर उतरताच अभिजीत दिपकेंनी आधीच असे म्हटले होते की, "बाकीच्या सगळ्यांना ताब्यात घेतलंच आहे, आता आपणही बघू काय होतंय!"

Abhijit Dipke 2 minute 21 second viral video
मोठी राजकीय उलथापालथ होणार अन् ६ महिन्यांत मोदी सरकार पडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

फक्त विमानतळच नाही, तर आज सकाळीच प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यालाही त्याच्या गुरुग्राम येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच जंतर-मंतरकडे येणारे मार्ग पोलिसांनी छावणीत रुपांतरित केले असून अनेक आंदोलकांना आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्लीतील प्रमुख रस्ते, मेट्रो स्टेशन्स आणि सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणत्याही आंदोलकाला जंतर-मंतरकडे जाऊ दिले जात नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com