दिल्लीत पाय ठेवण्याआधीच अभिजित दिपकेंना विमानातूनच उचलले, पोलिसांची मोठी कारवाई; व्हिडीओ समोर

Abhijit Dipke detained at Delhi airport : जंतरमंतरवरील CJP आंदोलनासाठी मुंबईहून दिल्लीला गेलेल्या संस्थापक अभिजित दिपके यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाला परवानगी नसल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.
Abhijit Dipke Detained at Delhi Airport
Abhijit Dipke Detained at Delhi Airport
Published On: 

Abhijit Dipke Detained at Delhi Airport : जंतर-मंतरवरील नियोजित आंदोलनासाठी मुंबईहून दिल्लीला निघालेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) चे संस्थापक अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी विमानातच ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, ते विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना थेट विमानातूनच ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

धक्कादायक म्हणजे, दिपके आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेण्यासाठी महिल पोलिसांना पाठवण्यात आले होते. दिपकेंनी तुम्ही विमानात आलाच कसे? असा सवाल विचारला. विमानातील सर्व घडामोडीचे लाईव्ह सीजीपीद्वारे कऱण्यात आले. पोलिसांकडून कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण विमानातील इतरांनाही हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.

अभिजित दिपके यांच्यासह सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीत आंदोलनासाठी कोणतीही परवानगी नसताना ते आंदोलन करण्याच्या भूमिकेत असल्याने पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Abhijit Dipke Detained at Delhi Airport
जंतर-मंतर आंदोलनाआधीच ध्रुव राठी ताब्यात, सकाळी सकाळीच पोलिसांनी घरातून उचलले

दरम्यान, आज सकाळीच प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यालाही पोलिसांनी त्याच्या गुरुग्राममधील घरातून ताब्यात घेतले होते. दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवत कारवाईचा बडगा उगारला आहे.

Abhijit Dipke Detained at Delhi Airport
मोठी राजकीय उलथापालथ होणार अन् ६ महिन्यांत मोदी सरकार पडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com