

३० जून २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
आगामी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
मृद व जलसंधारण विभागासोबत कृषी विभागाची यंत्रणाही सक्रिय होणार आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती बघता आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारनं आतापासूनच उपाययोजनांना वेग देण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. (Maharashtra Drought Action Plan: Water Conservation Works To Speed Up By 2027)
आगामी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 30 जून 2027 पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभागासोबतच कृषी विभागाची यंत्रणाही सक्रिय केली जाणार आहे. दोन्ही विभागांच्या समन्वयातून जलसंधारणाच्या कामांचा विस्तार आणि वेग वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलाय, अशी माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.
राज्यात यंदा एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण आणि पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जातेय. या परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून न राहता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलाय. गावपातळीवर ही कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यासाठी विविध विभागांच्या यंत्रणांचा एकत्रित वापर केला जाणार आहे.
स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना झाल्यानंतर राज्यात जलसंधारणाच्या विविध कामांना गती देण्यात आलीय. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांसारख्या योजनांच्या माध्यमातून पाणी साठवण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामांमध्ये प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर विभागाने प्रभावी कामगिरी केलीय.
आगामी पावसाळ्यापूर्वी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे पूर्ण करायची आहेत. उपलब्ध मनुष्यबळ आणि यंत्रणेचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज आहे. मृद व जलसंधारण विभागाची स्वतःची यंत्रणा सक्षम असली तरी ग्रामीण भागात थेट शेतकऱ्यांशी संपर्कात असलेल्या कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास कामांचा विस्तार करणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्यात समन्वय वाढवून संयुक्तपणे कामे करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.