आंब्याच्या झाडांना लागली सलाईन! आमराईतील प्रत्येक झाडाला छत्री अन् एक IV; उष्णतेपासून बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

Mango Trees Under Umbrellas With IV Drip Support : आंब्याची बाग वाचवण्यासाठी एका तरुण शेतकऱ्याने एक अनोखी पद्धत अवलंबलीय. शेतकऱ्याने झाडांवर छत्र्या लावल्या आहेत. यासह पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी त्याने झाडांना 'आयव्ही ड्रिप'च्या बाटल्या जोडल्या आहेत.
Farmer uses umbrellas to protect mango trees from scorching sunlight
Farmer uses umbrellas to protect mango trees from scorching sunlightsaam tv
Published On: 
Summary
  • बीड जिल्ह्यात दुष्काळ आणि तीव्र उष्णतेचा फटका आंब्याच्या बागांना बसत आहे.

  • पाणीटंचाईमुळे फळझाडे वाचवणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे.

  • अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव येथील महेश चव्हाण यांनी अनोखा प्रयोग

बीड जिल्ह्यात दुष्काळ आणि तीव्र उष्णतेचा परिणाम आता आंबा बागांवर दिसून येऊ लागलाय. पाणीटंचाईमुळे शेतातील पिके सुकू लागलीय. फळझाडे वाचवणे शेतकऱ्यांसमोर एक मोठे आव्हान बनलंय. अशा कठीण परिस्थितीत अंबाजोगाई तालुक्यातील वारपगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने आपली आंबा बाग वाचवण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबलीय. ही अनोखी पद्धत अवलंबणारे शेतकरी आहेत, वरपगावचे महेश चव्हाण.

Farmer uses umbrellas to protect mango trees from scorching sunlight
Agricultural Loan: १ बिघा शेतजमीन असेल तर किती कर्ज मिळू शकते?

प्रत्येक झाडाला दिली छत्री

आग ओकणाऱ्या सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण मिळावे म्हणून महेश चव्हाण यांनी प्रत्येक आंबाच्या झाडावर एक छत्री लावलीय. त्याचबरोबर, पाणीटंचाईच्या काळात झाडे जिवंत राहावीत, यासाठी सलाईनच्या बाटल्यांचा वापर करून त्यांना थेंब-थेंब पाणी दिले जातंय.

Farmer uses umbrellas to protect mango trees from scorching sunlight
एक म्हैस घेण्यासाठी किती कर्ज मिळू शकते? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता
beed farmer mahesh chavan
beed farmer mahesh chavan

वरपगावचे रहिवासी महेश चव्हाण हे एक फळबाग उत्पादक शेतकरी आहेत. आपल्या कठोर परिश्रमातून आणि निष्ठेतून त्यांनी आंब्याची बाग फुलवली आहे. मात्र यंदा दुष्काळ असल्यानं बाग टिकवणं त्यांच्यासमोर मोठं आव्हान तयार झालंय. आंब्याची झाडं वाळून जातील अशी चिंता त्यांना सतावत होती. बागेतील आंब्याची झाडे सुकू नयेत म्हणून त्यांनी प्रत्येक झाडावर एक छत्री लावलीय. यामुळे झाडांना थेट सूर्यप्रकाशापासून काहीसा दिलासा मिळतो आणि उष्णतेचा परिणाम कमी होण्यास मदत होते.

झाडे वाचवण्यासाठी एक-एक थेंब पाण्याचा वापर

यासह पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता, महेश चव्हाण यांनी आयव्ही (सलाईन) बाटल्यांचा वापर करून झाडांना हळूहळू पाणी देणारी एक प्रणाली विकसित केली. या पद्धतीद्वारे, पाण्याचा प्रत्येक थेंब झाडे वाचवण्यासाठी उपयोगात आणला जातो. महेश चव्हाण यांचा हा उपक्रम, प्रतिकूल परिस्थितीतही आपली पिके आणि फळबागा वाचवण्यासाठी शेतकरी किती अपार कष्ट घेऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण बनले आहे.

त्यांनी शोधलेली ही कल्पक आणि तात्पुरती उपाययोजना सध्या या भागात चर्चेचा विषय ठरली आहे. बीड जिल्हा सध्या भीषण दुष्काळाच्या छायेत आहे आणि तिथले शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत, आंबा बागांचे रक्षण करण्यासाठी दाखवलेली ही दृढ जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे.

आपल्या अनोख्या प्रयोगाबाबत महेश चव्हाण म्हणाले की, यंदा राज्यात दुष्काळ पडलाय आणि मी गेल्या दोन वर्षांपासून झाडं जगवत आहे. परंतु दुष्काळात झाडं कशी जगवायची हा प्रश्न पडला होता. त्यामुळे प्रत्येक झाडाला छत्री आणि सलाईन द्वारे पाणी दिलं. आधी बागेतील झाडांना ठिंबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. परंतु आता विहिरीत पाणी नसल्यानं मुबलक प्रमाणात पाणी देणं शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येक झाडाला सलाईन द्वारे पाच लिटरच्या जारच्या माध्यमातून पाणी देणार असल्याचं चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.