कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा; पुणे मनपा आयुक्तांचा व्यापाऱ्यांना कठोर इशारा

Pune Civic Body Issues Stern Warning: पुणे महापालिकेनंकडून अतिक्रमणावर, अवैध बांधकामावर धडक कारवाई करण्यात येतेय. सलग 5 दिवसांपासून शहराच्या विविध भागात ही कारवाई सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी तोडक कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण करण्यात आलं. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नवा इशारा दिलाय... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
PuneMunicipalCorporation
PuneMunicipalCorporationsaam tv
Published On: 

पुणे शहरात अतिक्रमणविरोधी कारवाईंना वेग आलाय. कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचा आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा धडका लावलाय. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत सुमारे 2 लाख चौरस फूट अतिक्रमण हटवण्यात आलंय. प्रशासनाकडून आत्तापर्यंत कुठे-कुठे कारवाई करण्यात आलीये ते पाहूयात...

अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा

क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमणमुक्त क्षेत्र

हडपसर-मांजरी 47,000 चौ. फूट

धनकवडी-कात्रज-आंबेगाव 40,000 चौ. फूट

विश्रामबागवाडा 18,000 चौ. फूट

शिवाजीनगर-घोले रोड 12,000 चौ. फूट

होळकर-पाटील 300 चौ. फूट

कारवाई झालेली ठिकाणे

लक्ष्मी रोड

सिंहगड रोड

वाघोली

हडपसर

वानवडी

बिबवेवाडी

औंध-बाणेर-बालेवाडी परिसर

फर्ग्युसन कॉलेज रोड

दरम्यान, प्रशासनानं केलेल्या कारवाईनंतरही शहरात पुन्हा अतिक्रमण होत असल्याचं समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय. मात्र, महापालिकेच्या कारवाईविरोधात व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय... अनधिकृत बांधकाम आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे शहरं विद्रुप होत असल्यानं अनेक सामाजिक संस्था आणि सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. कोरोना काळानंतर प्रथमच एव्हढी मोठी मोहीम महापालिकेकडून सुरु आहे. एव्हंढच नव्हे तर या कारवाईत नेत्यांच्या बगलबच्च्यांकडून येणारा दबाव झुगारून लावण्यासाठी आयुक्तांनी नाव जाहीर करण्याच्या फंड्याची जोरदार चर्चा आहे. वर्ष अखेर पर्यंत ही मोहीम अशीच सुरु ठेवण्याची सर्व स्तरावर मागणी आहे. अतिक्रमणामुळे शहरांचा जीव गुदमरत असताना महापालिकेनं हाती घेतलेली मोहीम इतर शहरांसाठी नक्कीच अनुकरणीय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.