कॅन्सर हा शब्द जरी ऐकला तरी भल्या भल्यांची अक्षरशः गाळण उडते. सर्वात जीवघेण्या आजारांपैकी एक असणाऱ्या कॅन्सरवर जालीम उपाय शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करताहेत. अशातच आता पँक्रियाटिक कॅन्सर म्हणजेच स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील संशोधनाला मोठं यश मिळालंय. संशोधकांनी विकसित केलेल्या 'डाराक्सोनरासिब' नावाच्या नव्या औषधामुळे स्वादुपिंडाच्या कर्करोगाची गाठ आकुंचन पावण्यास आणि नष्ट होण्यास मदत होत असल्याचं प्राथमिक चाचण्यांमधून समोर आलंय... 'डाराक्सोनरासिब' औषधाचा क्लिनिकल ट्रायलमध्ये कसा सकारात्मक परिणाम दिसून आलाय ते पाहूयात...
- 18 महिन्यांच्या निरीक्षणात 90% रुग्णांमध्ये कर्करोगाच्या गाठी वाढणं पूर्णपणे थांबलं
- 60% हून अधिक रुग्णांमध्ये ट्यूमरचा आकार कमी होऊन नष्ट झाला
- 12 पैकी एका रुग्णाच्या सीटीस्कॅनमध्ये कर्करोगाचा ट्यूमर दिसला नाही
- या औषधांतर्गत उपचार दिल्यानंतर 76.6% रुग्ण 1 वर्ष जिवंत राहिले
- मोठी प्रगती असली तरी याला अद्याप पूर्ण इलाज मानता येणार नाही, तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा
कर्करोगाविरोधात नवनवीन उपचार पद्धती विकसित होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, स्वादुपिंडाचा कर्करोग अतिशय घातक आहे. स्वादुपिंडात विकसित होणाऱ्या गाठींमध्ये वाढ होईपर्यंत आणि शरीराच्या इतर भागात तो पसरेपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे या आजाराचे निदान होण्यास बराच उशीर होतो. मात्र, या नव्या औषधाच्या चाचणीतून आगामी काळात कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. तसंच, स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर मात करण्यासाठी नवी आशा निर्माण झालीये...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.